शिक्षकांचे कोविड लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:46+5:302021-04-30T04:44:46+5:30

दहावी व बारावीच्या परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात याव्यात, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अंतर्गत गुण देण्यात यावेत, शाळा ...

Vaccinate the teacher's covid | शिक्षकांचे कोविड लसीकरण करा

शिक्षकांचे कोविड लसीकरण करा

Next

दहावी व बारावीच्या परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात याव्यात, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अंतर्गत गुण देण्यात यावेत, शाळा पातळीवरून गुण देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करण्याचे निर्देश शासनाने तातडीने द्यावेत तसेच सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने परीक्षा व त्याचे मूल्यमापन कसे करावे, या गोंधळात शिक्षक सापडले आहेत. पाचवी ते नववी व अकरावी या वर्गांच्या लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन याबाबत स्पष्टता करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, रेखा भेंडारकर, सहसचिव अर्चना बावणे, कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे, विष्णुदास जगनाडे, गोपाल बुरडे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, रवी मेश्राम, विपीनचंद्र रायपूरकर, अतुल बारई, राजू भोयर, सुनील गोल्लर, अनमोल देशपांडे, जी. एन. टीचकुले, प्रदीप मुटकुरे, दामोदर काळे, आदींनी केली आहे.

Web Title: Vaccinate the teacher's covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.