पालोरा व बोरगाव येथे १,३७७ जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:14+5:302021-09-14T04:41:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करडी (पालोरा) : मोहाडी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रियंका भिवगडे यांनी बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील ...

Vaccination of 1,377 animals at Palora and Borgaon | पालोरा व बोरगाव येथे १,३७७ जनावरांचे लसीकरण

पालोरा व बोरगाव येथे १,३७७ जनावरांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

करडी (पालोरा) : मोहाडी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रियंका भिवगडे यांनी बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील पशुपालक व लोकप्रतिनिधींना दिलेला शब्द पाळला. परिसरातील जनावरांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने गावागावात लसीकरण, तपासणी व औषधोपचार करण्याचा विशेष उपक्रम राबविला जात आहे. ढिवरवाडा येथे ६७० जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर नुकतीच पालोरा व बोरगाव येथे १,३७७ जनावरांची आरोग्य तपासणी, लसीकरण व औषधोपचार करण्यात आले. उर्वरित गावांमध्येही टप्प्याटप्प्याने लसीकरण होणार आहे.

मोहाडी सर्वचिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकारी प्रियंका भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत डॉ. उपवंशी, पशुसेवक नंदूरकर, बादल लांडगे, कर्मचारी सपाटे यांच्या सहकार्याने तीन गावांमध्ये विशेष लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे २,०४७ जनावरांना विविध रोगांचा प्रतिबंधक टीका लावण्यात आला. तसेच वंधत्व निवारण तपासणी, गर्भतपासणी व उपचार करण्यात आले.

ढिवरवाडा गावात लोकप्रतिनिधी व पशुपालकांच्या प्रतिसादामुळे पशु विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोरगाव येथे पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प या रोगांपासून रक्षण होण्यासाठी एकूण ५०० जनावरांचे लसीकरण केले. तर १९ जनावरांची गर्भ व वंधत्व निवारण तपासणी तर ५० जनावरांवर उपचार करण्यात आले. शनिवारी पालोरा येथे ७०० जनावरांचे लसीकरण व औषधोपचार करण्यात आले. यावेळी ८० जनावरांवर औषधोपचार, १८ जनावरांची गर्भतपासणी तर १५ जनावरांची वंधत्व निवारण तपासणी करण्यात आली.

या शिबिरांना पानोराचे सरपंच महादेव बुरडे, ग्रामपंचायत सदस्य भोजराम तिजारे, मंगेश डोमळे, रोशन कढव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उमेश तुमसरे, बोरगावच्या सरपंच अर्चना पिंगळे, सामाजिक कार्यकर्ता शामराव पिंगळे, उपसरपंच किसन बोदरे, केऊजी सिंदपुरे, अर्जुन उरकुडे, दुर्योधन टिचकुले, उमराव अतकरी, अनिक पत्रघरे, प्रवीण बारकर, मयाराम बाेंदरे, विनोद बोंदरे, संजय ठाकरे, मोहन अतकरी व मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थित होते.

130921\img_20210910_103353.jpg

बोरगाव येथे लसीकरणाचे वेळी उपस्थित सरपंच व ग्रामस्थ

Web Title: Vaccination of 1,377 animals at Palora and Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.