लसीकरण आपल्या दारी संकल्पनेतून बांपेवाडा ठरले लसवंत ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:01+5:302021-09-04T04:42:01+5:30
ग्रामपंचायत बांपेवाडातर्फे कोविडच्या सुरुवातीच्या काळापासूनच सजग राहून नागरिकांना वेळोवेळी सोशल मीडिया व अन्य माध्यमातून कोरोनाबद्दल जागृत करण्याचे काम केले. ...
ग्रामपंचायत बांपेवाडातर्फे कोविडच्या सुरुवातीच्या काळापासूनच सजग राहून नागरिकांना वेळोवेळी सोशल मीडिया व अन्य माध्यमातून कोरोनाबद्दल जागृत करण्याचे काम केले. सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप, हातधुवा कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर आखणी असे एक ना अनेक उपक्रम राबविले.
लस उपलब्ध झाल्यानंतर सचिव वीरेंद्र काशिवार, तलाठी टी. पटले, पोलीस पाटील खेडीकर, मुख्याध्यापक अंबादे, बोरकर, मेश्राम, कोटांगले, वलथरे, आरोग्य सेविका रुपाली वंजारी, आशा सेविका पुष्पा वंजारी, माया शाहारे, अंगणवाडी सेविका लांडगे, बांबोडे, राऊत, मदतनीस, रेशन परवानाधारक, बचतगट महिला तथा ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी विमल मेश्राम, संदीप मुरकुटे, विनोद फुंडे यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने गावात लसीकरणाबद्दल सुरुवातीला जनजागृती करून, गल्लोगल्ली आटो रिक्षावर स्पीकर लावून प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचे महत्व पटवून देऊन प्रोत्साहित करणे, डोअर ते डोअर भेट देऊन लसीकरण बद्दलची मनातील भीती दूर करून लसीकरणास प्रोत्साहित करणे व घरोघरी संपूर्ण कोरोनामुक्त ग्राम समिती व टीमसह लस उपलब्ध केले. लसीकरण शिबिरात उपस्थित न राहू शकणाऱ्या लोकांना घरोघरी जाऊन लस दिली व संपूर्ण गाव लसवंत केले. लसवंत ग्राम झाल्याबद्दल तहसीलदार कुंभारे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.