परसोडी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:17+5:302021-06-10T04:24:17+5:30
जवाहरनगर : वैश्विक महामारीपासून काहीअंशी बचावात्मक संरक्षण मिळावे, या हेतूने संपूर्ण जगात कोरोना लसीकरण सुरू आहे. त्या अनुषंगाने परसोडी ...
जवाहरनगर : वैश्विक महामारीपासून काहीअंशी बचावात्मक संरक्षण मिळावे, या हेतूने संपूर्ण जगात कोरोना लसीकरण सुरू आहे. त्या अनुषंगाने परसोडी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथेही लसीकरण सुरू आहे. यात ६० वर्ष पार केलेले व अतिजखमी व्यक्ती व ४५-५९ वर्षादरम्यान सर्व व्यक्ती आणि कोरोनायोद्धा यात पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, होमगार्ड, सैनिक यांचेही लसीकरण करण्यात येत आहे.
सदर उपकेंद्रात ४ मार्च २०२१ पासून लसीकरण शिबिर सुरू आहे. यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्डचे प्रथम व द्वितीय डोस शासकीय नियमानुसार देणे सुरू आहे. याप्रसंगी डॉक्टर चित्रा जंजाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका यू. बी. देवतळे, डी. डी. साकोरे, एम. पी. डब्ल्यू. वर्कर मंगेश वासनिक, गटप्रवर्तक वर्षा जीभकाटे, अश्विनी बांगर, उपकेंद्राचे सर्व परसोडी व ठाणा येथील आशा सेविका सहकार्य करीत आहेत.