ड्राय रनमधून लसीकरणाची झाली खात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:47+5:302021-01-09T04:29:47+5:30
लसीकरण अधिकारी -१ हे लाभार्थ्याला आलेले एसएमएस पाहून ओळखपत्राची पडताळणी करून, लाभार्थ्यांचे पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून थर्मल स्कॅनिंगही करीत ...
लसीकरण अधिकारी -१ हे लाभार्थ्याला आलेले एसएमएस पाहून ओळखपत्राची पडताळणी करून, लाभार्थ्यांचे पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून थर्मल स्कॅनिंगही करीत होते. लसीकरण अधिकारी -२ यांनी को-विन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या लाभार्थ्याला सर्च करून त्याची माहिती भरत होते. लाभार्थ्याचे नाव शोधल्यानंतर तीनप्रकारे व्हेरिफिकेशन करण्यात आले. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लसीकरणासाठी अधिकारी क्रमांक -३ यांच्याकडे पाठविण्यात येत होते. चार महत्त्वपूर्ण संदेश देऊन आज आपणास कोरोनाची लस देण्यात आली आहे. ही लस आपले कोरोनापासून संरक्षण करील, असे सांगत होते. लस न देताही लसीची रंगीत तालीम यशस्वीरीत्या पार पडली. जिल्हाधिकारी संदीप कद..........., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम पार पडली.