वैजेश्वरघाट पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:47 PM2019-05-06T22:47:52+5:302019-05-06T22:48:06+5:30

ऐतिहासिक, प्राचीन पवनी शहरामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी रोज पर्यटक येतात. या पर्यटन स्थळामध्ये वैजेश्वर घाट देवस्थान या पर्यटनस्थळाची भर पडली आहे. निसर्गरम्य वातावरण जवळून वाहणारी वैनगंगा नदी, धार्मिक वातावरण, स्वच्छता, संपूर्ण उपलब्ध सुविधा यामुळे येथे क्रियाकर्मासाठी व इतर कामासाठी रोज दुरून मोठ्या संख्येतील जनता, भाविक, पर्यटक येत आहेत. त्यामुळे पुढील दिवसात वैजेश्वर घाट देवस्थान हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार आहे.

Vaijeshwarghat will emerge as a tourist destination | वैजेश्वरघाट पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार

वैजेश्वरघाट पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार

Next
ठळक मुद्देवारसा ऐतिहासिक पवनीचा : तर मिळू शकतो अनेकांना रोजगार

लक्ष्मीकांत तागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ऐतिहासिक, प्राचीन पवनी शहरामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी रोज पर्यटक येतात. या पर्यटन स्थळामध्ये वैजेश्वर घाट देवस्थान या पर्यटनस्थळाची भर पडली आहे. निसर्गरम्य वातावरण जवळून वाहणारी वैनगंगा नदी, धार्मिक वातावरण, स्वच्छता, संपूर्ण उपलब्ध सुविधा यामुळे येथे क्रियाकर्मासाठी व इतर कामासाठी रोज दुरून मोठ्या संख्येतील जनता, भाविक, पर्यटक येत आहेत. त्यामुळे पुढील दिवसात वैजेश्वर घाट देवस्थान हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार आहे.
ऐतिहासिक पवनी शहरात मोठ्या संख्येने मंदीर, देवस्थानक आहेत. त्यामुळे पवनी शहराला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरांना भेट देण्यासाठी येतात. या मंदिरामध्ये वैजेश्वर देवस्थानाला फार महत्व आहे. वैनगंगा नदीच्या काठावर या देवस्थानामध्ये बारा ज्योर्तिलिंग आहेत.
कोणत्याही वाहत्या पाण्यात बेलाचे पान बुडत नाही. पण येथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत बेलाचे पान सोडले असता ते एका विशिष्ट ठिकाणी बुडते. त्यामुळे या घाटाला व देवस्थानाला फार महत्व आले आहे.
नागपूर, उमरेड, वर्धा, चिमुर, सिंदेवाही, हिंगनघाट आदी दुरच्या ठिकाणाहून अंत्यविधीच्या नंतरच्या क्रीयाकर्मासाठी, इतर धार्मिक विधीसाठी, पर्यटनासाठी मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक रोज अनेक वाहनांनी येत आहेत. दिवसें दिवस येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. निसर्गरम्य वातावरण, भर उन्हात सावली देणारे शेकडो वर्षापुर्वीचे वडाचे झाडे, सर्व उपलब्ध सुविधा त्यामुळे येणारा प्रत्येक व्यक्ती दुसºया वेळेस येतो. त्यामुळे अनेकांना येथे रोजगार मिळाला आहे.
न.प. ने व सकाळी येथे आंघोळीकरिता येणाºया तरूणांनी येथील घाटांची साफ सफाई केली आहे. कोणताही कचरा, केस, निर्माल्य आदी टाकण्यावर प्रतिबंध केल्यामुळे स्वच्छता राखली जात आहे. त्यामुळे या घाटांची सुंदरता वाढली आहे. त्यामुळे येथील सर्व घाट व देवस्थान नावारूपास आले आहे. येथे दिवसें दिवस येणाºयांची संख्या वाढत असल्यामुळे वैजेश्वर घाट देवस्थान येणाºया दिवसात पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार आहे.

Web Title: Vaijeshwarghat will emerge as a tourist destination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.