संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:51 AM2019-06-10T00:51:05+5:302019-06-10T00:51:30+5:30

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल ठरलेल्या वरठी येथील वैष्णवी विजय हिंगे या विद्यार्थीनीने विविध संकटावर मात करून नेत्रदीपक यश संपादित केले. वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर तिचा संघर्षाची कहाणी ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.

Vaishnavi's 10th win over the challenge | संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल

संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल

Next
ठळक मुद्देशिक्षणासाठी हवा मदतीचा हात : वडिलांच्या निधनानंतर खचलेल्या आईला सांभाळत केला अभ्यास

तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल ठरलेल्या वरठी येथील वैष्णवी विजय हिंगे या विद्यार्थीनीने विविध संकटावर मात करून नेत्रदीपक यश संपादित केले. वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर तिचा संघर्षाची कहाणी ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. एखाद्या चित्रपटापेक्षाही रोचक व रंजक आयुष्य जगणाऱ्या वैष्णवीच्या यशाची कहाणी भावी पिढीला प्रेरणा देणारी आहे.
वैष्णवीचे कुटुंब जवळच्या लावेश्वरचे. वडील रेल्वेत नोकरीवर. त्यांनी आपले बस्तान वरठीला हलवले. वैष्णवीचे पूर्व प्राथमिक शिक्षण वरठीत पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण भंडारा येथील जेसीस कॉन्व्हेंटमध्ये सुरू झाले. मोठी बहीण विशाखासोबत ती भंडारात शिक्षण घेत होती. वैष्णवी ९ व्या वर्गात असताना अचानक वडिलांचा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घरचा कमावता पुरुष घेल्याने आईची प्रकृतीत बिघडली. मोठी बहीण ११ वीला होती. वडिलांच्या जाण्याने तिही खचली. घरची परिस्थिती लक्षात घेऊन वैष्णवीने स्वत:ला सावरत आई व बहिणीची काळजी घेतली. आई व बहिणीला धीर देत लहानशा वयात आयुष्यात उभे राहण्याचे बळ दिले. शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगून मोठ्या बहिणाला समोरच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करून स्वत:ही अभ्यावर भर दिला.
दोघ्याही बहिणी खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याने आईला शिक्षणाचा खर्च पेलवत नव्हता. भविष्य निर्वाह निधी हि पूर्वीच उचल केल्याने आर्थिक संकट वाढले. नाममात्र १० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत होते. पण त्यात घरखर्च भागवून मुलीचे शिक्षण परवडत नव्हते. अश्यात त्यांनी मुलींना शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या बुद्धिमत्तेची चुणूक प्राचार्यांना असल्यामुळे त्यांनी परिस्थिती जाणून घेऊन मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली. पण मोठ्या मुलीला त्यांना काढून घ्यावे लागले.
शाळेने जबादारी घेतली आणि त्यानुसार वैष्णवीला हवी ती मदत करण्यात आली. दहावीत असल्याने तिला शिकवणी लावण्यासाठी पैसे आईकडे नव्हते. अशात एका खासगी शिकवणी घेणाºया शिक्षकांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेत तिला मोफत शिकवले. जिद्द व चिकाटीच्या साहाय्याने दहावीच्या निकालात उत्तूंग शिखर गाठता आले.
तिच्या संघर्षाची कहाणी येथे संपत नाही. जिल्ह्यातून प्रथम आल्याचे कौतूक होत आहे. शाळेने तिला ११ वी १२ वी शिकवण्याची संपूर्ण जबादारी घेतली आहे. यामुळे १२ वी सहज सर करता येईल. पण याव्यतिरिक्त लागणाºया खर्चाची तरतूद कशी करायची अशी चिंता तिच्या आईला सतावत आहे.
वैष्णवी जिल्ह्यात प्रथम येणे हा बहुमान वरठीच्या इतिहासात प्रथमच घडला आहे. यासाठी तिचे भरभरून कौतुकही सुरु आहेत. जिल्ह्यातून प्रथम आल्याची माहिती मिळताच ती राहत असलेल्या रेल्वे वसाहतीत तिला पेढे भरवून जल्लोष साजरा केला. आज ‘लोकमत’ला बातमी झळकताच घरी भेट घेणाऱ्यांची गर्दी वाढली होती. जिल्हा परिषद माजी सदस्य दिलीप उके, पंचायत समिती माजी सदस्य रवी येळणे, ग्राम पंचायत सदस्य संदीप, सामाजिक युवा नेते शैलेंद्र शेंडे, अतुल चौहान व हितचिंतकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतूक केले.

घरकाम करून गाठले शिखर
वैष्णवीने अभ्यासासाठी कठोर परिश्रम घेतले यात काही शंका नाही. घर रेल्वे रूळाजवळ असल्याने दिवसभर रेल्वेच्या आवाजाने अभ्यासात अडचण येत होती. यामुळे एका ग्रंथालयात जाऊन ती अभ्यास करायची. ग्रंथालय बंद करण्याची वेळ झाल्यावरही त्यात काम करणाºया बाईला थांबवून अभ्यास करायची. वैष्णवी घरातील नियमित काम आटोपून, आई व बहिणीला लागणारी सर्व मदत करून आपल्या अभ्यासाचे नियोजन करायची.

आईचा लढा
कुटुंब प्रमुख गेल्याने वैष्णवीच्या आईने धसका घेतला होता. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. कुटुंबात आधार नाही अशा अशा चिंतेत त्यांना आजाराने ग्रासले. पण या परिस्थितीत मुलीने दिलेले बाळ आईच्या लढ्यासाठी उपयोगी पडले. धीर न सोडता पैशाची चणचण असल्यावरही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी अडचण येऊ दिली नाही. तोडक्या निवृत्त वेतनात काटकसर करून मुलींकरिता खंबीर उभ्या राहिल्यात. मुलींना शाळेत सोडण्यापासून ते त्यांच्या सर्व गरजा कमीतकमी खर्चात भागवू लागल्या. अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरी मिळण्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे. पती रेल्वेत नोकरीवर असल्याने त्यांना रेल्वे वसाहतीत घर मिळाले होते. त्या व्यतिरिक्त त्यांना साधन नसल्याने अजूनही त्या तेथेच राहतात.
देवदूताची गरज
परीक्षेत उतुंग शिखर गाठणाºया विद्यार्थ्यांचा कल हा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राकडे असतो. पण वैष्णवीचे स्वप्न यापेक्षा वेगळे आहे. गलेलठ्ठ पैशाच्या मागे न धावत देशाची सेवा करण्याची तिची प्रबळ इच्छा आहे. बारावी नंतर तिला एनडीएला जायचे आहे. तूर्तास तिच्या शिक्षणाची जबाबदारी शाळेनी घेतली आहे. गुणवत्ता असूनही उत्कृष्ठ शिक्षणासाठी पैसा आलाच आणि हीच मदत पुरवणाºया देवदूताची तिला गरज भविष्यात भासणार आहे.

Web Title: Vaishnavi's 10th win over the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.