बहुमूल्य वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:36+5:302021-03-01T04:41:36+5:30

तालुक्यातील जंगले मोठी व घनदाट आहेत. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर ...

Valuable forest resources on the verge of extinction | बहुमूल्य वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

बहुमूल्य वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

Next

तालुक्यातील जंगले मोठी व घनदाट आहेत. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़. तालुक्यात पागोरा, गोलेवाडी, सोनेगाव, वाकेश्वर, रावणवाडी, एटेवाई, खापा, मौदी, नवरगाव, मेंढा, श्रीनगर, बोरगाव (खुर्द) या गावांत जंगले आहेत़.

रावणवाडी, खापा, मेंढा, पागोरा या जंगलात ससे, हरिण, वाघ, रानवराह असे अनेक प्राणी होते; परंतु आता जंगलाचे प्रमाणे कमी होत असून, या वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. जंगलातील प्राणी आपला मोर्चा गावाकडे वळवीत असून, १० ते १५ वर्षांपूर्वी जंगलातून एकटे-दुकटे जाणे शक्य नव्हते; पण आजघडीला वन्यप्राणी कमी झालेले आहेत़.

याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे व वनौषधी मिळत होती; पण ते वृक्ष आता दिसत नाहीत. सोबतच आवळा, बेहडा, हिरडे, बेल, येरुन्या, चार, करवंद, टेंभर, सिंदोळे, चिचबिलाई अशी फळझाडेसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़.

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही बहुमूल्य वनसंपदा नष्ट होईल, असे वाटते. वने ओसाड होत चालली आहेत. मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वृक्ष लागवडीसाठी शासन प्रयत्न व नवनवीन उपक्रम राबविते. शासनाचेच अधिकारी जंगलमाफियांना वृक्षतोडीचे परवाने देत आहे. त्यामुळे कितीही नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल तरी त्याचा काहीच फायदा होत नाही.

Web Title: Valuable forest resources on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.