निष्टीचे रेशीम उत्पादक वामन डहारे यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:02 PM2019-02-11T23:02:08+5:302019-02-11T23:02:25+5:30
परंपरागत शेतीसोबत रेशीम कोष निर्मितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पवनी तालुक्यातील निष्टी येथील शेतकरी वामन सदाशिव डहारे यांचा राज्य पुरस्कार देऊन दिल्ली येथे गौरव करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परंपरागत शेतीसोबत रेशीम कोष निर्मितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पवनी तालुक्यातील निष्टी येथील शेतकरी वामन सदाशिव डहारे यांचा राज्य पुरस्कार देऊन दिल्ली येथे गौरव करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निष्टी येथील वामन डहारे यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या शेतात रेशीम कोष निर्मितीस प्रारंभ केला. त्यांनी यात त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात शनिवारी झालेल्या सर्जींग सिल्क कार्यशाळेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील ज्ञानोबा मुंडे, औरंगाबादचे मारोती बोडखे, अहमदनगर जिल्ह्यातील समीर चांद शेख यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा रेशीम कार्यालयाचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी के.सी. बडगुजर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी रेशीम शेतीतून प्रगतीचा मार्ग साधला आहे.