विरली ग्रामपंचायत सभागृहात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:58+5:302021-05-19T04:36:58+5:30

विनोद प्रल्हाद मुंडले (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. विनोद ग्रामपंचायत सभागृहात मद्य प्राशन करून पोहोचला. तेथे काम करीत ...

Vandalism in Virli Gram Panchayat Hall | विरली ग्रामपंचायत सभागृहात तोडफोड

विरली ग्रामपंचायत सभागृहात तोडफोड

Next

विनोद प्रल्हाद मुंडले (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. विनोद ग्रामपंचायत सभागृहात मद्य प्राशन करून पोहोचला. तेथे काम करीत असलेल्या संगणक परिचालक चेतन भेंडारकर यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. एवढ्यावरच थांबला नाही, तर सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली. महापुरुषांच्या प्रतिमाही खाली पाडल्या. यावेळी ग्रामपंचायत सभागृहात हजर असलेले ग्रामपंचायत सदस्य मनोहर चुटे, वामन चुटे आणि रूपचंद कोरे यांच्यासमोर चेतन भांडारकर यांचा अपमान केल्याचेही या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची लाखांदूर पोलिसांनी तातडीने दखल घेऊन मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. पोलीस नायक गोपाल कोसरे, पोलीस शिपाई योगराज घरड यांनी सरपंच लोकेश भेंडारकर, उपसरपंच मिलिंद सिंव्हगडे, सदस्य मनोहर चुटे, चेतन भेंडारकर, बळिराम पवणकर, युवराज सुखदेव, आदींच्या समक्ष घटनेचा पंचनामा केला.

Web Title: Vandalism in Virli Gram Panchayat Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.