वैनगंगेच्या दूषित पाण्याचा नागरिकांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:41 PM2019-02-24T22:41:13+5:302019-02-24T22:41:33+5:30

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Vansangage infected water sits in the water | वैनगंगेच्या दूषित पाण्याचा नागरिकांना बसतो फटका

वैनगंगेच्या दूषित पाण्याचा नागरिकांना बसतो फटका

Next
ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविण्यात येत असल्याने पाणी सिंचित राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाºया नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.
धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील महिला पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून फारच धोका निर्माण झाला आहे.
नदी काठावरील गावचे गुरेढोरे, शेळ्या- मेंढ्या नदीतीलच पाणी पितात. परंतु दुषित पाण्यामुळे शेतकºयांना सुद्धा रोगराई निर्माण झाली आहे. सबब नदीकाठावरील गावचे लोक या दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले असून प्रत्येक माणसाचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेचे पाणी दूषित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नागपूर शहरातून वाहत येणाºया नाग नदीचे घाण व रासायनिक पाणी होय. सबब वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस रोगराईचा धोका निर्माण होत आाहे.
मासोळ्यांचे उत्पादनात घट
संपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नदी काठावरील ढिवर समाजाचे रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगेच्या पाण्यात जाऊ न देण्यासंबंधाने शासन स्तरावरून योग्य ती कारवाई तातडीने सुरु करावी. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जावू न देता ते पाणी शुद्ध करावे किंवा इतरत्र वळवावे, नदी काठावरील जनतेच्या आरोग्याचा तसेच शेतकºयांचे गुराढोरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Vansangage infected water sits in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.