‘वारी लालपरी’ने उलगडला एसटीच्या प्रवासाचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:05 AM2019-08-15T01:05:11+5:302019-08-15T01:05:33+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवासाचा इतिहास बुधवारी भंडारेकरांनी अनुभवला. वारी लालपरीच्या निमित्ताने एसटीच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाची माहिती अनुभवता आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवासाचा इतिहास बुधवारी भंडारेकरांनी अनुभवला. वारी लालपरीच्या निमित्ताने एसटीच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाची माहिती अनुभवता आली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वारी लालपरीची हा चालता फिरता चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्राच्या दौºयावर आहे. बुधवारी हा रथ भंडाराच्या बसस्थानकावर दाखल झाला. शहरातील नागरिकांसह प्रवाशांनी या रथाच्या माध्यमातून एसटीचा इतिहास जाणून घेतला.
राज्याच्या कानाकोपऱ्यात सुखरूप पोहचविणाऱ्या लालपरीच्या प्रेमात पडलेल्या पाच ध्येयव्येड्या तरूणांनी ही वारी लालपरीची सुरू केली आहे. १९४८ ते २०१९ पर्यंतचा एसटीत झालेला बदल यातून दिसून येतो. रोहित धेंडे, रवि मळगे, संयम धारव, सुमित देशभ्रतार, सुशांत अवसरे हे पाच मित्र एसटीची महती प्रवाशांपर्यंत पोहचत आहेत. १ जून रोजी या चित्ररथाचे उद्घाटन मुंबई येथे एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ५० शहरात हा चित्ररथ एसटीची माहिती देणार आहे.