पवनीत व्याघ्र दिनानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:10+5:302021-08-01T04:33:10+5:30
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रवींद्र घाटगे, अशोक पारधी, मैत्र वन्यजीव संस्थेचे महादेव शिवरकर उपस्थित ...
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रवींद्र घाटगे, अशोक पारधी, मैत्र वन्यजीव संस्थेचे महादेव शिवरकर उपस्थित होते. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी गावातील युवकांचा सहभाग असावा, यासाठी विभागाचे वतीने गणवेश वितरित करण्यात आले. सोबतच प्रत्येक कुटीमध्ये वाचनासाठी वन्यजीवावर आधारित पुस्तके वितरित करण्यात आले. महादेव शिवरकर यांनी वन्यजीव संरक्षण करताना आलेले अनुभव सांगितले.
वाघांचे अधिवास असलेल्या जंगलात मानवाने अतिक्रमण केलेले आहे. शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विषारी किटकनाशकाचा वापर करीत आहेत या सर्वांमुळे वाघ व अन्य वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. हे टाळण्यासाठी जनजागृती ची गरज असल्याचे अशोक पारधी यांनी सांगितले. यावेळी पी. बी. मुंडे, एस. एस. हांडे, पी. ओ. बावनथडे, बी. एस. ईखार, बी. एस. भोसले, एस. आर. नेवारे, एम. एस .सोनवाणे, एम .एम.गायकवाड, वनपाल डी. आर. जयस्वाल, एम. टी. डहाके उपस्थित होते. संचालन पी. ओ. बावनथडे यांनी केले. आभार एम. टी. डहाके यांनी मानले.