काकेपार येथे जैवविविधता दिनानिमित्त विविध स्पर्धां
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:22+5:302021-05-26T04:35:22+5:30
पवनी : कोरोना महामारीमुळे शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आळा बसत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अडचण ...
पवनी : कोरोना महामारीमुळे शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आळा बसत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अडचण निर्माण होत आहे. शैक्षणिक विकास होऊ नये, विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात सामील होऊन त्यांचा शैक्षणिक विकास नित्यनियमाने सुरू राहावा, विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या गुंतून राहावे याकरिता "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस" २२ मे शाळेत साजरा करण्यात आला. याकरिता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काकेपार व मॅजिक बस फाउंडेशनच्या माध्यमाने विद्यार्थी विकास कसा साधता येईल व विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात कसे टिकून राहतील, या दृष्टीने योजना आखण्यात आली आणि अंमलबजावणी करण्यात आली. विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहून जीवन कौशल्याचा विकास होण्याच्या दृष्टीने काकेपार शाळेतील शिक्षक सातत्याने आपले कार्य करीत आहे. त्या कार्याला विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत. या स्पर्धेत विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सामील झालेत. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी या स्पर्धांमध्ये समाविष्ट झाले. तसेच पक्षी पाणवठा, पक्षी संवर्धन विद्यार्थ्यांनी केले. या स्पर्धेकरिता शाळेचे शिक्षक विलास गिरी, मुरारी कढव, चंपा केदारे, हिरालाल वाकडे, फाउंडेशनचे रघुनाथ वानखेडे, जगदीश मालोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.