अमली पदार्थ सेवन विराेधी दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:24 AM2021-06-28T04:24:11+5:302021-06-28T04:24:11+5:30
भंडारा : अमली पदार्थाचे गैरवापर आणि अवैध तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. सदर कार्यक्रम भारतीय औषधी अनुसंधान ...
भंडारा : अमली पदार्थाचे गैरवापर आणि अवैध तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. सदर कार्यक्रम भारतीय औषधी अनुसंधान संस्था भंडारा अंतर्गत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय पुरस्कृत इंडियन वेलफेअर इंट्रिग्रेटेड रिहॅबिलिटीशन सेंटर फाॅर ॲडिक्टस बेला भंडारा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. पिंडकेपार गावात व्यसनमुक्तीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उमरी फुलमाेगरा गावातील अंगणवाडी केंद्रात व्यसनमुक्ती महिला मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. उद्घाटन सरपंच रंजना कडव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डाॅ. वारे, अंगणवाडी सेविका देवांगणा राेडगे, वेणू गेडाम आदी उपस्थित हाेते.
इंडियन वेलफेअर व्यसन उपचार केंद्र बेला येथे माेफत आराेग्य शिबिराचे आयाेजन करण्यात आले. उद्घाटन डाॅ. रविंद्र वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. लक्ष्मण रामटेके, सुखाराम पडाेळे आदी उपस्थित हाेते. येथे एकूण ५२ रुग्णांची माेफत तपासणी व उपचार करण्यात आले. कार्यक्रमासाठी डाॅ. ज्याेती वानखेडे, लीना रामटेके, अजय वानखेडे, लाेकेश बनकर, भारती थुलकर, शालिनी आगलावे, प्रिया निकाेसे, अजय पळघामाेळ, श्याम साठवणे आदींनी सहकार्य केले.