क्रीडांगणावरून दोन दिवसात भाजीबाजार स्थानांतरित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:01+5:302021-08-02T04:13:01+5:30
नगरपरिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नेहरू क्रीडांगणावर भाजीबाजार भरत असल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. क्रीडांगणावर पोलीस, सैन्य भरती व ...
नगरपरिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नेहरू क्रीडांगणावर भाजीबाजार भरत असल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. क्रीडांगणावर पोलीस, सैन्य भरती व मैदानी खेळाचा सराव करण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे हा भाजीबाजार इतरत्र हलविण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात आमदार राजू कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी, नगरसेवक, क्रीडापटू, बाजाराचे कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रीडांगणाची पाहणी केली. पाहणी दरम्यान क्रीडांगणाची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खेळाडूंना अपघाताची शक्यता जास्त आहे. त्यामुळे बैठकीत नेहरू क्रीडांगणावरील भाजीबाजाराला तत्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊन ती दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी तहसीलदार बाळासाहेब तेढे, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, उडान संस्थेच्या कल्याणी भुरे, अनिकेत डोंगरे, प्रशांत भोयर, राहुल डोंगरे, निहाल इलमे, लोकेश गभने, प्रशिक्षक अर्चना शर्मा उपस्थित होते.