भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, डाळीचे दर मात्र आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:22 AM2021-07-23T04:22:01+5:302021-07-23T04:22:01+5:30
भंडारा : कोरोनाकाळात भाजीपाल्याचे दर हवे त्या प्रमाणात वाढले नव्हते, मात्र गत महिन्याभरापासून भाजीपाल्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. हे ...
भंडारा : कोरोनाकाळात भाजीपाल्याचे दर हवे त्या प्रमाणात वाढले नव्हते, मात्र गत महिन्याभरापासून भाजीपाल्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून, दुसरीकडे डाळींचे दर मात्र आटोक्यात असल्याचे दिसून येते. तरीही ७० ते ९० किलो रुपयांपर्यंतच्या डाळी घेणे गरीब कुटुंबीयांना आजही परवडण्यासारखे नाहीच.
भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. मात्र कडधान्याचे उत्पादन त्या प्रमाणात होत नाही. परिणामी, डाळ अन्य प्रदेशांतूनच आयात करावी लागते. विद्यमान स्थितीत डाळीचे भाव स्थिर असल्याचे समजते. दोन महिन्यांपूर्वी शंभरी पार गेलेली डाळ आता ९० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे.
बॉक्स
...म्हणून डाळ महागलेली!
भंडारा जिल्ह्यात भात व गव्हाचे उत्पादन घेतले जाते. मात्र कडधान्य पिकांतर्गत डाळीचे हव्या त्या प्रमाणात उत्पादन घेतले जात नाही. बहुतांश डाळ ही अन्य राज्यांतून आयात केली जाते. परिणामी, वाहतुकीचा खर्चही त्यात जोडला जातो. सध्या डाळीच्या भावात वीस ते पंचवीस रुपयांनी घट जाणवत आहे. परंतु कोणतीही डाळ ७० ते ९५ प्रति किलो या दरात विकली जात आहे.
बॉक्स
...म्हणून भाजीपाला कडाडला!
उन्हाळा असो की पावसाळा ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक होत असली तरी अन्य जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो. दरवर्षी उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडत असतात. मात्र पावसाळ्यात भाजीपाल्याची आवक थोडीफार मंदावल्याने भाजीपाल्याचे दर पडल्याचे दिसून येते.
बॉक्स
सर्वसामान्यांचे होताहेत हाल
दहा रुपये किलो दराने मिळणारे टमाटर आता २५ ते ३० रुपये किलो झाले आहेत. अशीच दरवाढ प्रत्येक भाजीमागे दिसून येते.
- दीप्ती साखरे, गृहिणी.
कोट
सध्या भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. सर्वच भाज्या महाग झाल्याने कोणती भाजी घ्यायची, असा प्रश्न पडतो. सध्या डाळवर्गीय पदार्थ बनविण्याकडे माझा कल आहे.
- सीमा शाहू, गृहिणी.