भाजीविक्रेत्याचा प्रामाणिकपणा, सोन्याचे मंगळसूत्र केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 07:26 PM2022-01-21T19:26:36+5:302022-01-21T19:27:50+5:30
Bhandara News प्रामाणिकता हरविल्याचा पदोपदी अनुभव येत असताना एका भाजीपाला विक्रेत्याला सापडलेले आठ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र परत करून आपल्या प्रामाणिकतेचा परिचय दिला.
भंडारा : प्रामाणिकता हरविल्याचा पदोपदी अनुभव येत असताना एका भाजीपाला विक्रेत्याला सापडलेले आठ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र परत करून आपल्या प्रामाणिकतेचा परिचय दिला. येथील खात रोडवरील भाजीपाला विक्रेत्याच्या प्रामाणिकपणाचे आता सर्वत्र कौतुक होत असून मंगळसूत्र मिळताच महिलेनेही आभार मानले.
येथील खात रोडवरील न्यू शिवाजी नगर येथील संगीता दिनेश मारवाडे यांचे मंगळवारी सायंकाळी घराजवळील भाजीपाला दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हरवले होते. सर्वत्र शोधाशोध केली मात्र थांगपत्ता लागत नव्हाता. मंगळसूत्र हरविल्याची माहिती त्यांनी पतीला दिली.
काही वेळात आपण भाजी खरेदीसाठी गेलो याची आठवण झाली. थेट भाजीपाला दुकान गाठले. मात्र दुकान बंद झाले होते. भाजीविक्रेत्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याला याबबत विचारणा केली. त्याने मॅडम मी दुकान उघडल्यानंतर शोधून मिळाले तर सांगतो असे सांगितले. दुसऱ्या दिवशी आलोक आपल्या दुकानात आला. भाजीपाला बाहेर काढत मंगळसूत्राचा शोध सुरू केला. एका टोमॅटो कॅरेटमध्ये मंगळसूत्र दिसले. दुसरीकडे संगीताने मंगळसूत्र आता काही मिळणार नाही, हे गृहीत धरले होते. मात्र सकाळी आलोक मंगळसूत्र घेऊन संगीताच्या घरी पाेहचाला. दुकानात सापडलेले मंगळसूत्र परत केले.
मंगळसूत्राची क्लिप निघुन टमाटर कॅरेटमध्ये पडले होते. परंतु त्यावेळी ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. परंतु भाजीपाला विक्रेत्याच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सौभाग्योणे परत मिळाले. मारवाडे दाम्पत्यने भाजीच्या दुकानात जाऊन आलोकचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. त्याच्या इमानदारीचे कौतुक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मयूर लांजेवार यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्राहक उपस्थित होते.