परसबागेत फुलली भाज्यांची माळ
By admin | Published: August 15, 2016 12:16 AM2016-08-15T00:16:52+5:302016-08-15T00:16:52+5:30
‘मन है चंगा, तो कटोस में गंगा’ असे रविदासांनी म्हटले आहे. ते तंतोतंत मानवी कर्माशी जुळते आहे.
इच्छा तिथे मार्ग : छोट्या जागेमध्ये विविध भाज्यांचे उत्पादन
मुखरु बागडे पालांदूर
‘मन है चंगा, तो कटोस में गंगा’ असे रविदासांनी म्हटले आहे. ते तंतोतंत मानवी कर्माशी जुळते आहे. इच्छा तिथ मार्ग या प्रमाणे कर्तव्याशी एकनिष्ठ राहत अपेक्षित काम केल्यास ध्येय निश्चित गाठता येते. याची प्रतिची येते आदित्य लाखनीकर या शिक्षकाने तयार केलेल्या परसबागेला बघितल्यावर येते.
अगदी घराच्या समोर खुल्या चार आर जागेत वांगी, भेंडी, कारले, दोडके, काकडी, पालक, मेथी आदी भाज्या लावून परसबागेला हिरवेगार उद्यान बनविले आहे. अत्यंत कमी खर्चात पण देखणी बाग सर्वांच्याच कुतुहलाचा विषय बनली आहे.
पालांदुरला गांधी चौकात स्व.शरदराव लाखनीकरांचे प्रसिद्ध दीर्घ आवार असून काही मोजकेच फुलझाडे व इतर वनस्पतींची येथे लागवड करण्यात आली होती. यात बदल करून अनोख काही तरी करण्याची जिद्द आदित्यने मनात कोरले. याकरिता त्यांनी माळी संबू भुसारी यांची साथ घेतली व छोट्याखानी चार आर म्हणजे १० डिसमिलच्या जागेत अनेकविध भाज्यांची यशस्वी लागवड केली. यात सेंद्रीय, जैविक व अपेक्षित प्रमाणात रासायनिक गुणांच्या खताचा उपयोग करीत बाग हिरवीगार केली. जाता येताना बागेकडे लक्ष गेल्यास सहजपणे मनात भाव तयार होतात, वा... वा, किती छान! असे उद्गार सहज निघतात.
‘केल्याने होत आहे रे, आधी केलीचे पाहिजे’... असेच म्हणावेसे वाटते.