भाजीपाला विकला जातोय कवडीमोल भावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:12 PM2018-04-08T22:12:15+5:302018-04-08T22:12:15+5:30

आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली.

Vegetables are being sold in a cottage shop | भाजीपाला विकला जातोय कवडीमोल भावात

भाजीपाला विकला जातोय कवडीमोल भावात

Next
ठळक मुद्देफटका शेतकऱ्याला : वांगी, टमाटर, कोबी, लवकी, काकडी पाच रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली. १ ते ३ रुपये एवढा चिल्लरचा भाव होता तर शेतकऱ्याला त्याचा थोकात काय मोबदला मिळाला असेल हे न विचारलेले बरे.
आता तर लग्नसराईची धूम सुरु असताना वांगी केवळ १-२ रुपये एवढ्या कमी भावात विकत असल्याने तोडणीचा व वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाही. वांगी तोडण्यापर्यंतचा कठोर निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे. फुलकोबी, पानकोबी, हिरवीकोबी चा सुद्धा हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेल्याने भाजीपाल्याची शेती नुकसानदायक ठरली. बाजारात भाजीपाल्याला मागणीच नसल्याने व पुरवठा अधिक असल्याने भाव गडगडलेच आहेत.
मधला अडत्या मात्र सुखी
शेतकऱ्याचा माल लहान किंवा स्थानिक बाजारात विकत नसल्याने मोठ्या बाजारात अडत्याकडे पाठवून विक्री केली जाते. यात अडत्या आपला कमीशन काढून व्यापाऱ्याला व शेतकऱ्याला माल विकतो. महाराष्ट्रात ७० टक्के भाजीपाला अडत्याच्या माध्यमातून विकला जातो. अडत्याला विकलेल्या रकमेच्या निश्चित ठरावाने अडत मिळतेच. व्यापारी व शेतकरी मात्र स्वत: धोका पत्करत भाजीपाला उत्पादीत करतो व विकतो. हल्ली तर भाजीपाला नागपूर, भंडारा येथे थोक बाजारातून पुन्हा उत्पादीत गावाकडेच व्यापाºयांच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी न्येत आहे.
पालांदूर आठवडी बाजारात किरकोळ दरात वांगे, टमाटर, लवकी, काकडी पाच रुपये प्रतिकिलो ने विकता विकले नाही. मिरची १५-२० रु. किलो, कारले ४०-५० किलो, फुलकोबी १०-२० प्रती किलो विकण्याचा प्रयत्न सुरु होता. सायंकाळी ५ वाजतापर्यंत किरकोळ दुकानावर भाजीपाला शिल्लकच होता हे विशेष.

Web Title: Vegetables are being sold in a cottage shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.