भाजीपाला सडतोय शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:39+5:302021-04-20T04:36:39+5:30

बॉक्स भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नाही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकण्याचा या काळात प्रयत्न ...

Vegetables are rotting on the bund of the field | भाजीपाला सडतोय शेताच्या बांधावर

भाजीपाला सडतोय शेताच्या बांधावर

Next

बॉक्स

भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नाही

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकण्याचा या काळात प्रयत्न चालविला आहे. मात्र, तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च आणि बाजारातील भाव याचे गणित लागत नाही. दहा किलो वांगी विकून भजी खाण्याएवढेही पैसे घरी येताना शेतकऱ्याच्या हाती येत नाहीत. सध्या भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत. ठोक दरात वांगी पाच रुपये किलो, भेंडी दहा रुपये किलो, कारले १२ रुपये किलो, टोमॅटो चार रुपये किलो, तर चवळी दहा रुपये किलो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता शेतातील भाजीपाला तोडतच नसल्याचे दिसत आहे.

बॉक्स

एकरी ५० ते ६० हजारांचे नुकसान

भंडारा जिल्ह्यात तंत्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला पीक घेतले जाते. मल्चिंग पेपर, ठिंबक सिंचन व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला एकरी सरासरी ५० ते ६० हजार रुपये मिळतात. मात्र, सध्याची स्थिती पाहता हातात काहीही येण्याची शक्यता दिसत नाही. पालांदूर येथील प्रभाकर कडुकार म्हणाले, यंदा शेतात टोमॅटो आणि वांगी लावली आहेत; परंतु बाजारपेठ बंद असल्याने शेतातच माल झाडाला तसाच आहे. संचारबंदीत माल विकावा कुठे, असा प्रश्न आहे. बळिराम बागडे म्हणाले, कारले आणि भेंडीच्या भरवशावर वर्षभराचे नियोजन केले होते; परंतु आता कोरोना संचारबंदीने आम्ही पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत. संचारबंदी काही काळ वाढविण्यात आली तर आम्हाला शेतातील माल फुकटात वाटायची वेळ येईल.

Web Title: Vegetables are rotting on the bund of the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.