रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

By admin | Published: June 22, 2016 12:29 AM2016-06-22T00:29:47+5:302016-06-22T00:29:47+5:30

तुमसरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने बंद रेल्वे फाटकाला धडक दिली. सुदैवाने मोठा अपघात टळला.

Vehicle Stops | रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

Next

देव्हाडी येथील घटना : मोठा अनर्थ टळला, मालवाहू वाहन ताब्यात
तुमसर : तुमसरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने बंद रेल्वे फाटकाला धडक दिली. सुदैवाने मोठा अपघात टळला. काही क्षणात रेल्वेगाउी येथून गेली. संबंधित मालवाहू वाहनाविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई करुन वाहन ताब्यात घेतले. ही घटना रविवारी घडली.
मालवाहू ट्रक एम एच ३५ के ३७६७ तुमसरकडून-गोंदियाकडे जात होता. दरम्यान तुमसर रोड येथील फाटक क्रमांक ५३२ बंद होती. बंद फाटकाला ट्रकने जोरदार धडक दिली. यात फाटक मध्यभागातून वाकली. क्षणात येथून रेल्वेगाडी गेली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करुन मालवाहतूक ट्रकला ताब्यात घेतले. सदर वाहनाविरोधात रेल्वे नियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. दर महिन्यात या रेल्वे क्रॉसींगवर वाहन फाटकाला धडक देतात. परंतु कायमस्वरुपी उपाययोजना व सुरक्षेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
येथे सीसीटीव्ही कॅमेरे तथा मजबूत फाटक लावण्याची गरज आहे. केवळ पोकळ फाटक येथे लावण्यात आली आहे. सध्या उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने बायपास मार्गाने वाहने येथे जातात. वाहनांची एकच गर्दी फटाकावर होते. वाहने पुढे नेण्यात चढाओढ येथे पहावयास मिळते.
रेल्वे प्रशासनाने सुरक्षेची खबरदारी घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Vehicle Stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.