वाहनी तलाठी सजा एक महिन्यापासून कुलूप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:53+5:302021-04-27T04:35:53+5:30
तुमसर : येत्या काही दिवसात नवीन खरीप हंगामाला सुरुवात होईल. पुढील हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मागील सहा ...
तुमसर : येत्या काही दिवसात नवीन खरीप हंगामाला सुरुवात होईल. पुढील हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मागील सहा महिन्यापासून धानाचे बोनस अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांनी पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. सिहोरा परिसरातील वाहनी तलाठी सजाचे कार्यालय मागील एक महिन्यापासून बंद आहे. शेतकऱ्यांना सध्या सातबाराची गरज आहे.
३० एप्रिलपर्यंत रब्बी हंगामाची धानाची नोंदणी करण्याकरिता सातबाराची गरज आहे. सातबारा कुठून घ्यावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मागील सहा महिन्यापासून खरीप हंगामाचे धानाचे बोनस अजूनपर्यंत मिळाले नाहीत. पुन्हा नवीन हंगामात शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. पुढील खरीप हंगामाकरिता नियोजन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ धानाचे चुकारे जमा करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
पैशाअभावी शेतकऱ्यांचे नियोजन बिघडल्याचे दिसत आहे. शासनाने धानाचे बोनस देण्याची हमी दिली होती. परंतु अजूनपर्यंत ती पूर्ण करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.