वाहनी येथे पशुवंध्यत्व निदान व औषधोपचार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:12+5:302021-09-11T04:36:12+5:30

आयोजित वंध्यत्व शिबिरात जनावरांना, गाई व म्हशींना उत्पादनक्षम करून उत्पादन वाढविणे या नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत खनिज मिश्रण, जीवनसत्त्व मिश्रण, ...

Veterinary Diagnosis and Medication Camp at Vahani | वाहनी येथे पशुवंध्यत्व निदान व औषधोपचार शिबिर

वाहनी येथे पशुवंध्यत्व निदान व औषधोपचार शिबिर

Next

आयोजित वंध्यत्व शिबिरात जनावरांना, गाई व म्हशींना उत्पादनक्षम करून उत्पादन वाढविणे या नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत खनिज मिश्रण, जीवनसत्त्व मिश्रण, जंतनिर्मूलन औषध, गोचीड निर्मूलन आदी औषधोपचार करण्यात आले. पशुसंवर्धनातून काळजी व आर्थिक विकास संदर्भात माहिती उपायुक्त डॉ. वंजारी यांनी दिली आहे. शिबिरात ३७८ जनावरांना वंध्यत्व निदान आणि औषधोपचार करण्यात आले. शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती डॉ. कापगते यांनी दिली आहे. जनावरांचे योग्य दिशेने पालनपोषण केल्यास आर्थिक उन्नती साधता येईल. दुग्ध व्यवसायातून आर्थिक समस्या व अडचण निकाली काढण्यात मदतीचे ठरणार असून, पशुपालक, शेतकऱ्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणे व संपर्कात येणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

या परिसरात अन्य पशू दवाखान्यात पशुवंध्यत्व निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जनावरांना विविध आजाराची लागण होत आहे. योग्य औषधोपचार मिळत नसल्याने शेतकरी जनावरे गमावत आहे. जनावरांना वेळोवेळी औषधोपचार केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. असे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले. आयोजित शिबिराचे संचालन डॉ. पंकज कापगते, डॉ. जगन्नाथ देसट्टीवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. विष्णू दळवी यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी पशुपालक व शेतकऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Veterinary Diagnosis and Medication Camp at Vahani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.