वाकेश्वर येथे पशुवंध्यत्व निदान व औषधोपचार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:43+5:302021-09-27T04:38:43+5:30
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नरेश कापगते, सरपंच गीता अर्जुनकार, उपसरपंच पंकज जीभकाटे, शिशूपाल आतिलकर, मनोज बोरकर, डोमेश्वर बोरकर, ...
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नरेश कापगते, सरपंच गीता अर्जुनकार, उपसरपंच पंकज जीभकाटे, शिशूपाल आतिलकर, मनोज बोरकर, डोमेश्वर बोरकर, पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके, डाॅ. गिरीधर वैद्य, डाॅ. प्रीती श्रावणकर, डाॅ. आर. आर. निखारे, ए. आर. हजारे, व्ही. यू. भडके, वाय. एस. बिसेन, जी. आर. कंगाले उपस्थित होते. आयोजित शिबिरात १३५ गायी-म्हशींचे वंध्यत्व निदान करून औषधोपचार करण्यात आले. शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच पशुपालनातून पशुपालकांची आर्थिक उन्नती साधण्यासंदर्भात डाॅ. नरेश कापगते यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. वंजारी यांनी पशुपालकांच्या पशूपालनाविषयी येणाऱ्या तांत्रिक अडचणी यासंदर्भात नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संपर्कात राहावे, असे आवाहन केले. शिबिराचे आयोजन पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डाॅ. सविता चोले, पहेलाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. आर. निखारे यांनी केले. संचालन डाॅ. गुणवंत भडके तर आभार प्रदर्शन डाॅ. सविता चोले यांनी केले. शिबिरासाठी ग्रामस्थ, पशुपालक तसेच पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.