पशुवैद्यकीय दवाखाना प्रभारीच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:39 PM2018-05-16T22:39:01+5:302018-05-16T22:39:01+5:30

पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी पद मागील सहा महिन्यापासून प्रभारी असून पट्टीबंधक व परिचर यांच्या खांद्यावर असह्य भार जड होत असून पशुपालक खासगी उपचारातून होरपळत आहेत.

In the veterinary hospital in charge of the shoulders | पशुवैद्यकीय दवाखाना प्रभारीच्या खांद्यावर

पशुवैद्यकीय दवाखाना प्रभारीच्या खांद्यावर

Next
ठळक मुद्देस्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : पशुपालक चिंतेत

मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी पद मागील सहा महिन्यापासून प्रभारी असून पट्टीबंधक व परिचर यांच्या खांद्यावर असह्य भार जड होत असून पशुपालक खासगी उपचारातून होरपळत आहेत.
लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील प्रभावी गाव पालांदूर ख्यातीप्राप्त आहे. सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्याची परंपरा पालांदूरवासीयांची मोडीत निघत वर्तमानात स्थानिक लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पालांदूरला शासकीय सेवा कमी होत आहे. यातून विकास मागे जात असून भूतकाळातला विकास व नेतेमंडळींची आठवण होत आहे. ग्रामीण रुग्णालयाला पशुवैद्यकीय दवाखान्याला पात्र डॉक्टर नाही. बायपासचे भिजत घोंगडे आहे. तलाठी कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. नायब तहसील कार्यालय नाही. असे कित्येक प्रश्नांनी पालांदूरवासी बेजार आहेत. पण लोकप्रतिनिधी कर्तव्यात नापास होत असल्याने सामान्यांना त्यांचा हक्क मिळत नाही. लोकप्रतिनिधी कंत्राटदारीत जाम खुश असल्याने पैसा लगाव पैसा कमाव सूत्रात बांधले जात आहेत. सेवाभाव गहाण असल्याने तालुक्याचे व जिल्ह्याचे सक्षम अधिकारीही पालांदुरच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
पालांदूर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांकडे पशुधन टिकून आहे. उदरनिर्वाहाकरिता शेतीला आधार समजत दुधासोबत शेणखताकरिता पशुपालन अत्यंत महत्वाचे आहे. पण हे पशुधन शासकीय निराशेपोटी संकटात सापडले आहे.
पालांदूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील प्रथम श्रेणी पशुविकास अधिकारी डॉ.प्रज्ञा झावरे मागील सहा महिन्यांपासून प्रसूती रजेवर आहेत. त्यांच्या जागी नव्याने अधिकारी न आल्याने एवढा मोठा दवाखाना पट्टीबंधक व परिचर यांच्या भरोशावर सुरु आहे. जेवढे कळते तेवढे उपचार करीत असल्याची कबुली उपस्थित कर्मचाºयांनी दिली.
खासगीतील वैद्यक पशुपालकांच्या घरी जात पशुचिकित्सा करीत अमर्याद फिस लोटत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानात जमेल तेवढी चिकित्सा करून मोकळे होत आहेत. एकाने तर एखाद्या पशुची चिकित्सा केली व आरोग्यात सुधारणा नाही झाली किंवा काही कारणाने दुसºया चिकित्सकास बोलावले तर त्यांनाच बोलवा म्हणत नव्याने उपचार करण्याकरिता वेडेवाकडे घेतले जाते. शासकीय सेवा नसल्याने त्यांचीच हुजूरीगिरी करीत, ‘साहेब चला ना.. गाय, बैल, शेळी आजारी आहे’, अशी विनवणी करावी लागत आहे. पालांदुरात दररोज हजारो लिटर दुधाची उलाढाल होत आहे. शेळ्या, कोंबड्यांचा बाजार जिल्ह्यात सुपरिचित आहे. पशुधन हल्ली संकटात आले असून शासकीय प्रशासकीय अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

तीन महिन्यांपासून पालांदुरचे पशुवैद्यकीय पद सांभाळतआहे. किटाडी येथे कार्यरत असून मंगळवार व गुरुवारला वेळेनुसार प्रामाणिकपणे सेवा देत आहे. सद्या माझी प्रकृती बरी नसल्याने सुटीवर आहे.
-डॉ.सी.एल. लोणारे, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी, पालांदूर.

Web Title: In the veterinary hospital in charge of the shoulders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.