बळीराजाला मदत आवश्यक
By admin | Published: November 5, 2016 01:02 AM2016-11-05T01:02:14+5:302016-11-05T01:02:14+5:30
विरोधी बाकावर असताना धानाला प्रति क्विंटल तीन हजार रूपये भाव द्या..
कोरोटे यांचा इशारा : प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
सालेकसा : विरोधी बाकावर असताना धानाला प्रति क्विंटल तीन हजार रूपये भाव द्या म्हणून ओरडणारे आता फक्त ६० रूपये वाढवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करून थट्टा करीत आहेत. त्यांनी ही थट्टा बंद करावी. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा महासचिव व आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कोरोटे बोलत होते. जय बजरंग क्रीडा मंडळ मुंडीपारच्या वतीने येथे तीन दिवसीय प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी नेते सहषराम कोरोेटे यांनी केले.
कार्यक़माच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सालेकसा माजी सभापती यादनलाल बनोठे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सोनपुरी क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य अर्चना राऊत, मुंडीपारचे सरपंच किरण वाघमारे, कावराबांधचे माजी सरपंच गजानन मोहारे, माजी सरपंच घनश्याम नागपुरे, बलीराम बसोने, राधेश्याम नागपुरे, खेमचंद उपराडे, झनक नागपुरे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गुमानसिंग उपराडे, उपाध्यक्ष महेश वाघमारे, सचिव सुखदास लिल्हारे, पोलीस पाटील चंद्रपाल नागपुरे, अमरचंद जमदाळ, दयाराम चौडाये, भैयालाल भोयर उपस्थित होते.
ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेची मोठी उत्सुकता असून या वेळी युवा वर्गासह महिला-पुरूष शेतकरी व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी क्रीडा स्पर्धांचे महत्व सांगत सहषराम कोरोटे यांनी शेतकऱ्यांपुढे विद्यमान युती शासनाच्या नाकर्तेपणा समोर आणणाचा प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले की, सत्ता प्राप्त करण्यासाठी नेहमी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लक्ष साधणारे मागील दोन वर्षात त्यांच्या वेदना समजून घेण्यात मुळीच लक्ष देताना दिसत नाही.
पोकळ घोषणा करणारे प्रत्यक्षात कधीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. या बाबी आता सर्वसामान्य जनतासुध्दा समजू लागली आहे, असे कोरोटे म्हणाले. या वेळी यादनलाल बनोठे व इतर मान्यवरांनीसुध्दा आपले विचार मांडले. ही खुली स्पर्धा असून यात कोणीही आपली चमू बनवून सहभागी होत आहेत. स्पर्धा बघण्यासाठी तालुक्यातील विविध गावातून प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. गावात स्पर्धा होत असल्याने व शेतकरी प्रेक्षकसुध्दा वेळ काढून येत आहेत व स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
प्रास्ताविक गुमानसिंह उपराडे यांनी मांडले व स्पर्धेतील नियम व अटी बद्दल माहिती सादर केली. तसेच सर्वांनी खेळ भावनेतून सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमासाठी भोजराज चौडाये, विजय लिल्हारे, राजकुमार वाघमारे, गेंदलाल जमदाड, महेश उपराडे, कैलाश मेश्राम, खेमराज किरसान, राजकुमार बसोने, कुवर वाघमारे, मदन वाढई, भागीराम नागपुरे, रमेश लिल्हारे, पन्नालाल नागपुरे, राजेंद्र भोयर, सुकदास बसोने,ओमेश बसोने, भूषण मोहारे, महेंद्र नागपुरे, जितेंद्र नागपुरे,सोविंद भोयर, वामन परसगाये, सुंदर मानकर, रविंद्र भोयर, व इतर सहकारी सहकार्य करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)