पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:04 AM2019-07-13T01:04:28+5:302019-07-13T01:04:50+5:30

यावर्षी जिलह्यात रोवणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस अद्यापही झाला नाही. परिणामत: पेरण्या लांबणीवर गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहेत. परिसरातील काही भागात सिंचनाची सोय असणारे शेतकरी मात्र आपली रोवणी आटोपून घेत आहेत.

The victim's struggle for survival | पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड

पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड

Next
ठळक मुद्देसिंचनाचा अभाव : नेरला उपसा सिंचनाची आता खरी आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : यावर्षी जिलह्यात रोवणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस अद्यापही झाला नाही. परिणामत: पेरण्या लांबणीवर गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहेत. परिसरातील काही भागात सिंचनाची सोय असणारे शेतकरी मात्र आपली रोवणी आटोपून घेत आहेत. परंतु ज्यांच्याकडे मोटार पंप सिंचनाची व्यवस्था नाही असा शेतकऱ्यांची पऱ्हे जगविण्यासाठी धडपड सुरू आहे.
अड्याळ परिसरात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतर आद्रा नक्षत्रात दमदार पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कामाला एकाएकी वेगाने सुरुवात झाली. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत पेरणीची कामे मोठ्या जोमात आणि आनंदात झाली. त्यानंतर मात्र पाऊस पाहिजे त्या प्रमाणात नाही बरसला नाही. परिणामत: शेततळे, तलाव अद्यापही तुडूंब भरलेच नाही. पाण्याची वाढ एक दोन दिवसाआड येणाºया पावसाने तर होत आहे. परंतु रोवणी करायची झाल्यास पाहिजे तेवढे पाणी अद्याप बहुसंख्य शेतकºयांच्या शेतात नाही. चिखलणीसाठी बांध्यामध्ये पाणी साचले नसल्याने पºह्यांचे गठ्ठे बांधायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तर दुसरीकडे पाऊस न बरसल्याने दुबार पेरणीचे संकट बळावले आहे. त्यामुळे जवळच असणाºया नेरला उपसा सिंचनाची गरज भासण्याची शक्यता यावेळी अड्याळ आणि परिसरातील शेतकºयांनी दर्शविली आहे.

Web Title: The victim's struggle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती