अंगणवाडी कर्मचाºयांचा विजय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:46 PM2017-10-09T22:46:59+5:302017-10-09T22:47:15+5:30
अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सविता लुटे होत्या. यावेळी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती नियंत्रक आयटक नेते दिलीप उटाणे आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, गौतमी मंडपे, छाया क्षीरसागर, मंगला रामटेके, शमीम बानो, सुनंदा बडवाईक, लिलावती बडोले, छाया गजभिये उपस्थित होते. अवसरे यांनी हा विजय अंगणवाडी कर्मचाºयांच्या एकजुटीमुळेच माधनवाढ झाली आहे असे म्हणाले. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी मानधन वाढ झाल्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही. पुढच्या वर्षी अजून शासन मानधन वाढ करेल, याची मला खात्री आहे. २०१४ मध्ये मानधनवाढ दिली. अंगणवाडी कर्मचारी चांगले काम करतात याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. विरोधी पक्षात असताना बरेच वेळा विधानसभेत प्रश्न लावून धरले होते. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठींबा देणारे सरपंच, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संघटना आदिचे यावेळी आभार मानण्यात आले. आभार प्रस्ताव संघटनेच्या जिल्हा सचिव अल्का बोरकर यांनी मांडला. तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. तर प्रत्यक्ष संपात सहकारी करणाºयांचा सत्कार करण्यात आला.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्याबाबत ६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधीसोबत सायंकाळी ५ वाजता बैठक घेऊन चर्चा केली. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मान्य करीत सेवाज्येष्ठता प्रमाणे मानधनवाढ, दरवर्षी पाच टक्के केल्याने वाढ, पोषण आहार रकमेत वाढ व इतर मागण्या मान्य केल्यामुळे बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने घेतला
मानधनवाढ सहजासहजी शासनाने दिली नसून अंगणवाडी कर्मचाºयांच्या २६ दिवस लढा देवून एकजुटीचा दर्शन शासनाला दाखविल्यामुळे मानधनात वाढ होऊ शकली असे प्रतिपादन आयटक नेते कॉ.दिलीप उटाणे यांनी करून अंगणवाडी कर्मचाºयांना कसा मानधन मिळेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत आशा कर्मचाºयांना शासन कुठलेही मानधन देत नाही. मात्र नवीन योजना आली की गावातील आशा या संप काढत सेविका व आशात भांडण लावण्याचे काम शासनाने केले. पोषण आहार वाटप करण्यासाठी आशांना कधी वैद्यकीय अधिकारी यांनी काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. मानसिक त्रास दिला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात काही आशांनी आहार वाटप केला. आशांबद्दल गैरसमज करू नये. त्याच प्रमाणे बचत गट, सरपंच, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा अंगणवाडी कर्मचाºयांच्या विजयात मोठा वाटा आहे.
शासनाने आशा कर्मचाºयांना मानधन देण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेने घ्यावा. अशी मागणी कॉ.दिलीप उटाणे यांनी केली. संघटना यासाठी प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांकडे फाईल आहे. लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करावा म्हणून खासदार, आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देतील. आशांकडून अगदी वेठबिगारीचे काम करून घेतले जाते. यासाठी अंगणवाडी, आशा व गट प्रवर्तकांना केंद्र शासनाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी किमान वेतन देण्याची घोषणा केली तो आदेश अजूनपर्यंत निघालेला नाही. यासाठी ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे ‘संसद घेरो’चे आयोजन केले आहे. त्यात सहभागी व्हावे असेही आवाहन उटाणे यांनी केले.
यावेळी कॉ.सदानंद इलमे, सुरेश अवसरे, रिता लोखंडे, गौतमी मंडपे, छाया क्षीरसागर, मंगला रामटेके, शमीम बानो, सुनंदा बडवाईक, लिलावती बडोले, छाया गजभिये, उषा रणदिवे, कुंदा भदाडे, लहाना राजूरकर यांनी विचार मांडले. संचालन आशा रंगारी तर आभार मंगला गभणे यांनी मानले. अंगणवाडी विजय मेळाव्याला प्रचंड उपस्थिती होती अशी माहिती कार्याध्यक्ष कॉ.हिवराज उके यांनी दिली.