विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष

By admin | Published: December 22, 2015 12:42 AM2015-12-22T00:42:38+5:302015-12-22T00:42:38+5:30

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका १९ डिसेंबर रोजी पार पडल्या.

Victory with the winners of party workers | विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष

विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष

Next

भंडारा : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका १९ डिसेंबर रोजी पार पडल्या. आज सकाळपासून मतमोजणी करण्यात आली. विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष काढून गावात रॅली काढली.
तुमसर तालुक्यातील डोंगरी/बु. भंडारा तालुक्यातील खराडी, राजेदहेगाव, परसोडी अशा एकूण ४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि तुमसर तालुक्यातील देवरीदेव, चिखला, वाहनी, सुकळी, नकुल, मोहाडी तालुक्यातील जांभोरा, खमारी/बु., निलज, करडी, भंडारा तालुक्यातील सावरी(ज), कवडसी, दवडीपार, साकोली तालुक्यातील पळसगाव, धर्मापूरी, लाखनी-किटाळी, मुरमाडी व लाखांदूर तालुक्यातील मांढळ, सरांडी/बुज १७ ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक घेण्यात आली.
मोहाडी (खापा)ची निवडणूक ठरली चुरशीची
तुमसर : आरक्षित जागेकरिता दुसऱ्याच प्रवर्गाच्या इसमाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तो अर्ज फेटाळला गेला. तर निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी उमेदवाराविनाही जागा रिक्त ठेवण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील मोहाडी (खापा) ग्रा.पं. मध्ये घडला. असा प्रकार घडण्याचे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत डोंगरी (बु.) ची सार्वत्रिक तसेच ग्रामपंचायत लोहारा, सुकळी नकुल, चिखला, देवरी देव, वाहणी, पाथरी व मोहाडी (खापा) या गावातील ग्रा.पं. च्या रिक्त झालेल्या जागेकरिता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. त्या दरम्यान ग्रा.पं. मोहाडी (खापा) येथील प्रभागाकरिता ना.म.प्र. प्रवर्गाकरिता जागा आरक्षित करण्यात आली असता त्या जागेकरिता मोहाडी (खापा) येथील एका अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील इसमाने नामांकन अर्ज दाखल केले. त्याचबरोबर अन्य दोन ना.मा.प्र. प्रवर्गाच्याही इसमांनी उमेदवारी दाखल केली. अशा एकूण तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. पैकी दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान फेटाळण्यात आल्याने निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार आमोरासमोर उभे असताना एकाचा विजय होणे निश्चित होते किंवा मग एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतला कि दुसऱ्या व्यक्ती अविरोध निवडून आला असता. परंतु या ग्रा.पं. च्या निवडणूक रिंगणात उभे असलेल्या दोन्ही उमेदवारांची निवडणुकीतून माघार घेतला व नवीन इतिहास रचला असेच म्हणावे लागेल. एकही उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने ग्रा.पं. मोहाडीची रिक्त जागा ही निवडणूक घेवूनही नाईलाजास्तव रिक्तच ठेवावी लागली. तर उर्वरित ग्रा.पं. मध्ये मतदानाची प्रक्रिया राबवून निकालही घोषित केला. त्यात ग्रा.पं. डोंगरी (बु.) येथील प्रभाग क्र. १ मध्ये नामाप्र प्रवर्गातून प्रकाश जिभकाटे, सर्वसाधारण स्त्री निर्मला गोळंगे, प्रभाग क्र. २ सर्वसाधारण दिनेश चौधरी, सर्वसाधारण स्त्री ममता घडले, प्रभाग क्र. ३ नामाप्र कुलपत कटरे, अनु. जाती. स्त्री सरस्वती मेश्राम, सर्वसाधारण स्त्री भारती चौधरी, प्रभाग क्र. ४ अनु. जमाती कार्तिक चांदेवार, ना.म.प्र. स्त्री सविता सोनवाने, सर्वसाधारण राजकुमार तोलानी, प्रभाग क्र. ५ सर्वसाधारण मनोज हवनते, अनु. जमाती स्त्री दिव्या परतेती, नामाप्र स्त्री लक्ष्मी घटारे तर सुकळी (न.) येथे सुलिंद नागपुरे, चिखला येथे उमाबाई सेनकपाट, देवरी (देव) येथे ब्रम्हकला कटरे, वाहणी येथे उमेश नटू बांडेबुचे, पाथरी येथे फुलवंता रविशंकर वाढीवे या निवडून आल्या. तर ग्रा.पं. लोहारा येथे सुरेंद्र बाबूराव कुंभरे व वर्षा माणिक मऱ्हे यांच्या विरोधात एकही नामांकन अर्ज प्राप्त न झाल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सदर निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.पी. डोंगरे, एच.एस. भलावी यांनी काम पाहिले.
परसोडीत ‘आपली’ पॅनेलचे वर्चस्व
जवाहरनगर : ग्रामपंचायत परसोडी येथे ग्रामविकास व लोकसेवा पॅनला धुव्वा उडवित बहुमताकडे वाटचाल केली. यात वॉर्ड क्रमांक १ मधून पंकज सुखदेवे, जिजा बावनकुडे, कौशल्या हटवार, वॉर्ड क्रमांक २ मधून ओमकरन थापा, प्रणाली चव्हाण, वॉर्ड क्रमांक ३ मधून कुंदा हटवार, दर्शन फंदे, कुलदीप कावळे, वॉर्ड क्रमांक ४ मधुन कल्पना मोटघरे, ज्ञानेश्वर हटवार, श्यामकला चकोले यांचा समावेश आहे. येथे आपली पॅनलचे ५ उमेदवार जिंकून आले. तर ग्रामविकास पॅनल १, चकोले पॅनलचे ३, कावळे पॅनलचे ३ निवडून आले असून आपली पॅनल सत्ता करणाच्या मन:स्थितीत असल्याची खंमग चर्चा ग्रामस्थांत आहे.
दोन महिन्यानंतर सरपंच-उपसरपंच पदाकरीता निवडणूक होणार आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. येथे सरपंच पद हे अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातील राखीव आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे येथे सर्व नविन चेहरे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. तर माजी सभापती राहिलेल्या कल्पना मोटघरे ग्रामपंचायत सदस्य झाल्या हे येथे विशेष.
खराडीत स्पष्ट बहुमत
खरबी/नाका: ग्रामपंचायत खराडीमध्ये माया हिवसे व दुर्वास हिवसे हे दोन उमेदवार अविरोध निवड झाले. प्रभाग एकमध्ये संजय हिवसे यांनी ७६ मते, भीमाभाई गजभिये यांनी ७२ मते, प्रभाग ३ मध्ये अंजिरा डडेमल यांनी ८० मते प्राप्त केले. खराडीत विकास आघाडीची ४ उमेदवार तर परिवर्तन पॅनलचे ३ उमेदवार निवडून आले. विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे.
राजेदहेगाव येथे त्रिशंकू
खरबी/नाका: राजेदेहेगाव येथे प्रभाग १ मध्ये किरण थोटे यांनी १७८ मते, वैशाली उके यांनी ११४ मते, रामचंद्र लेंडे यांनी १३९ मते. प्रभाग २ मध्ये विणा लेंडे यांनी १६६ मते, भिमेश ढबले यांनी १४२ मते. प्रभाग ३ मध्ये संजीवकुमार रोडगे यांनी १५९ मते, आशा ईटनकर यांनी २१५ मते तर सारिका डोंगरे यांनी १६२ मते प्राप्त करुन विजयी संपादन केला. प्रभाग २ मधून बबिता हुमने अविरोध निवडून आले.
किटाडी ग्रामपंचायतीत सत्ताधारी विजयी
पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही प्रभागात सत्ताधारी पक्षाचेच दोन्ही उमेदवार विजयी झाले. प्रभाग १ मध्ये प्रीती गेडाम ३९२ मते घेत १८७ मतांनी विजयी झाल्या तर प्रभाग ३ मधून धनंजय घाटबांधे २६४ मते घेत ७४ मतांनी विजय संपादन केला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी गड राखला हे विशेष.
प्रभाग १ मधून वंदना गवळे पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेल्याने ते पद रिकामे झाले होते तर सरपंच प्रभू भुजाडे स्वर्गवासी झाल्याने ती जागा मोकळी होती. या दोन्ही जागेकरिता निवडणूक पार पडली. प्रभाग १ मधून प्रीती गेडाम विरुद्ध विजया बागडे तर प्रभाग ३ मध्ये धनंजय घाटबांधे विरुद्ध अशोक चौधरी असा सामना पार पडला. शनिवारला निवडणूक शांततेत पार पडून आज सोमवारला तहसील कार्यालय लाखनी येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गिऱ्हेपुंजे, तलाठी अक्कुलवार यांनी काम पाहिले. गावातून विजयी रॅली काढून आनंद व्यक्त करण्यात आला. ९ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये सत्ताधाऱ्यांकडे ६ जागा तर विरोधकांकडे ३ सदस्य असून सरपंच पदाकरिता माजी पंचायत समिती सदस्य हे सरपंच पदाचे धनंजय घाटबांधे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे.
मुरमाडी येथे काँग्रेस समर्थकांची रॅली
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीची मतमोजणी आज तहसील कार्यालयात पार पडली. मुरमाडी (सावरी) येथे प्रभाग क्र.३ मधुन प्रिया दिगांबर वंजारी या ३८१ मत घेवून विजयी झाल्यात तर प्रतिस्पर्धी माधवी जीवन बावनमुळे यांना ३७८ मत मिळाली. नोटा चे २१ मत होते. मतमोजणी तहसीलदार डी.सी. बोबंर्डे व निवडणुक निर्णय अधिकारी टी.आर. गिऱ्हेपुंजे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. मुरमाडी येथे प्रिया वंजारी तिच्या विजयानंतर कांग्रेस समर्थकांनी रॅली काढली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Victory with the winners of party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.