दुर्मिळ पांढऱ्या कंकराचे दर्शन

By admin | Published: August 26, 2016 12:39 AM2016-08-26T00:39:34+5:302016-08-26T00:39:34+5:30

कंकर पक्ष्यांत काळा, पांढरा आणि चिमणा कंकर असे प्रकार आढळून येतात.

View of the rare white kakkara | दुर्मिळ पांढऱ्या कंकराचे दर्शन

दुर्मिळ पांढऱ्या कंकराचे दर्शन

Next

शिवशंकर बावनकुळे ल्ल साकोली
कंकर पक्ष्यांत काळा, पांढरा आणि चिमणा कंकर असे प्रकार आढळून येतात. पक्षी निरीक्षण करीत असताना अरण्यलेखक विनोद भोवते यांना दुर्मिळ पांढऱ्या कंकर पक्ष्यांचे दर्शन झाले. या पक्ष्याविषयी सांगताना ते म्हणाले की हा पक्षी कापूस सारखा पांढरा असून त्याची मान, डोके व चोच काळी असते. मानेवर पिसे नसतात. पाय लांब असून ते काळे असतात. हा पक्षी नेहमी पाणथळ भागात आढळून येतो. विणीच्या हंगामात याच्या पांढऱ्याशुभ्र पिंसावर किंचित पिवळसर, काळपट झाक दिसायला लागते. एरव्ही हा पक्षी पांढराशुभ्र दिसतो. पाणथळ जमिनीत चरत असताना वेळोवेळी आपली चोच जमिनीत खुपसताना दिसतो. आपल्या वक्रहत्यारासारख्या चोचीचा उपयोग जमिनीतील किटक, मृदूप्राणी, गांडूळ, उकरून काढण्यासाठी करतो. गादगवतातील तृणधान्य आवडतात. अलिकडे तलाव परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे विनोद भोवते यांनी सांगितले.

Web Title: View of the rare white kakkara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.