भारनियमनाविरूद्ध शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 12:19 AM2016-08-13T00:19:00+5:302016-08-13T00:19:00+5:30

तालुक्यातील १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारे मागणी करीत आहे.

Vigilance movement against farming | भारनियमनाविरूद्ध शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

भारनियमनाविरूद्ध शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Next

कृषी उत्पादनावर परिणाम! : ऊर्जामंत्र्यांशी करणार चर्चा
साकोली : तालुक्यातील १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारे मागणी करीत आहे. मात्र या क्रुर शासनाला काही शेतकऱ्यांची दया येत नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून शेतकरी येत्या १४ तारखेला उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
या चर्चेदरम्यान भारनियमन बंद न झालस दि. १६ पासून जुनी पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी दिली आहे.
साकोली तालुक्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीद्वारे शेतीसाठी कृषी फीडर वेगळे करण्यात आले. सुरवातीला कृषी फिडर वेगळे केल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. भारनियमन होणार नाही असे सांगण्यात आले. मात्र माच्र महिन्यापासून शेतीच्या कृषीपंपाना फक्त आठ तास विजपुरवठा देण्यात येईल असा आदेश काढण्यात आला.
शेतकऱ्यांनी जि.प. सदस्य अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर यांच्या नेतृत्वात विजवितरण कंपनी समोर धरणे आंदोलन घेण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता यांनी भारनियमन विरोधात शेतकऱ्यांच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगु व त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले.
हे आश्वासनही फोल ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७ ला आमदार बाळा काशीवार यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली व भारनियमनाची समस्या सांगितली.
मात्र यातुनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे १४ ला उर्जामंत्री बावनकुळे यांच्या दालनात कैफीयत मांडणार आहेत. जोपर्यंत भारनियमन बंद होणार नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहेत.
याबाबत माहिती अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर, नंदकिशोर समरीत, नरेश नगरीकर, अशोक बोरकर, सतीश कापगते, सुधीर गोबाडे यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Vigilance movement against farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.