विज्युक्टाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:55 PM2019-02-26T22:55:15+5:302019-02-26T22:56:00+5:30
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर अशोशिएशनद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवडणूक प्रशिक्षण रद्द करण्याबाबत निवेदन मंगळवारी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर अशोशिएशनद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवडणूक प्रशिक्षण रद्द करण्याबाबत निवेदन मंगळवारी देण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी ११ भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूक २०१९ द्वारे हे प्रशिक्षण पोलिस बहूद्देशीय भंडारा येथे दुपारी १ वाजता आयोजीत करण्यात आले आहे. परंतू सध्या वर्ग १२ वीची बोडार्ची परिक्षा सुरु असून याच दिवशी सकाळ सत्रामध्ये रसायनशास्त्र व दुपारच्या सत्रामध्ये इतिहास या विषयाचे पेपर्स आहेत.
या निवडणूक प्रशिक्षणासाठी बोडार्ची कार्यात केंद्राध्यक्ष व अतिरिक्त केंद्राध्यक्ष म्हणून काम करीत असणाठया सर्वच प्राध्यापकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून पत्र प्राप्त झालेत.
एकाच दिवशी दोन महत्वपूर्ण काम करणे शक्य नसल्यामुळे निवडणूक प्रशिक्षण यात सुट देण्याची मागणी विजुक्टाचे अध्यक्ष मार्कंड गायधने व सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी शिष्ट मंडळाने संबधित समस्येविषयी सांगीतले असता निवडणूक अधिकारी डॉ. पांचाळ यांनी निवडणूक प्रशिक्षण हे प्राथमिक स्वरुपाचे असल्यामुळे जबाबदारी लक्षात घेता बुधवारी २०१९ रोजी होणाऱ्या प्रशिक्षणात उपस्थित राहणे गरजेचे नाही.
त्यानंतरही अनेक प्रशिक्षण होणार असून त्यात आपण हजर राहू शकाल असे सांगीतले. त्यामुळे केंद्राध्यक्ष व अतिरिक्त केंद्राध्यक्ष यांची विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता परिक्षेची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडवे, या बोर्ड कार्यात काम करित असतांनी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहीले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन करणार नाही, अशी ग्वाही दिली.
निवेदन देते वेळी प्रा. एम.बी किरणापूरे, प्रा.एस.एस. गोंधळे, प्रा. आर एम पंचभाई, प्रा. एस.व्ही. गोंडाणे, प्रा. व्हि.एल.हटवार प्रा. एम. एम. काटेखाये, प्रा. एस.एस. बंसोड, प्रा. एम.एस. मुदलीवार, प्रा. आर.पी. वहाणे उपस्थित होते.