पाण्याच्या शोधार्थ अस्वल गावात

By Admin | Published: April 14, 2017 12:27 AM2017-04-14T00:27:54+5:302017-04-14T00:27:54+5:30

सालेभाटा मार्गावर मुंगसाजी महाराज मंदिराजवळील कडूनिंबाच्या झाडावर जंगलव्याप्त भागातून अस्वलाचे पिल्लू

In the village of Asval in search of water | पाण्याच्या शोधार्थ अस्वल गावात

पाण्याच्या शोधार्थ अस्वल गावात

googlenewsNext

लाखनी : सालेभाटा मार्गावर मुंगसाजी महाराज मंदिराजवळील कडूनिंबाच्या झाडावर जंगलव्याप्त भागातून अस्वलाचे पिल्लू पाण्याच्या शोधात लाखोरी गावाकडे सकाळी ७ वाजताच्या सुमारास आंब्याच्या झाडावर चढले. अस्वल आल्याचे कळताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.
प्रसंगावधान राखून गावकऱ्यांनी ही माहिती लाखनी वनविभाग परिक्षेत्राधिकारी कार्यालयाला कळविली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी. कोळी हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाला गावातून हाकलण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. दुपारी १ वाजताच्या सुमारास अस्वल कडूनिंबाच्या झाडावरून उतरून एक किलोमीटर अंतरावर पळत गेले. त्यानंतर आंब्याच्या झाडावर चढले. वृत्त लिहीपर्यंत अस्वल झाडावरून उतरले नव्हते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In the village of Asval in search of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.