शाश्वत स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:12 PM2018-02-02T22:12:52+5:302018-02-02T22:13:22+5:30
भंडारा जिल्हयात शाश्वत स्वच्छता आणि प्लॉस्टीक बंदीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा जिल्हयात शाश्वत स्वच्छता आणि प्लॉस्टीक बंदीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. ग्राम पंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छतेसाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत तर बहुतांश ठिकाणी प्लॉस्टीक बंदीसाठी नागरिक पुढे सरसावले आहेत.
तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे ग्राम पंचायतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हळीदीकुंकू कार्यक्रमात महिलांना प्लॉस्टीक बंदीसाठी वाणात कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात जिल्हयात प्लॉस्टीक बंदी व्हावी याकरिता पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायतस्तरावर हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून गावात शाश्वत स्वच्छता ठेवणे व प्लॉस्टीक बंदीचा संदेश व कापडी पिशव्यांचा वापर व्हावा असा उदेश्य आहे. ग्राम पंचायतस्तरावर कार्यक्रमातून शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीचा संदेश दिल्या जात आहे.
स्वच्छतेसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाला लाखांदूर तालुक्यातील विरली बुजचे सरपंच लोकेश भेंडारकर यांची उपस्थिती होती. तसेच सरपंच संध्या प्रभाकर गुरवे, सचिव विद्या गजभिये, ग्राम पंचायत सदस्या शंकुतला सोनारे, मंगलाताई गुरवे, रेखा पासवान, पोलिस पाटील मिनाक्षी लाडसे, विनोद गुरवे, प्रभाकर गुरवे, जिल्हा कक्षाचे अंकुश गभने, राजेश येरणे, पंचायत समिती गट संसाधन केंद्राचे पल्लवी तिडके, हषार्ली ढोके, पौर्णिमा डूंबरे, वर्षा दहीकर, सरिता गुरवे, प्रशांत गुरवे उपस्थित होते.
भेंडारकर यांचा सत्कार
ज्या ग्राम पंचायतचा आदर्श घेवून गाव घडविण्यात आले. त्या लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच लोकेश भेंडारकर यांचा ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच संध्या गुरवे यांचे सत्कार केला. भेंडारकर यांनी, ग्राम पंचायतने गावात घडविलेल्या स्वच्छतेच्या परितर्वनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. असेच कार्य गावाने केले तर आपला गाव हा संपूर्ण जिल्हयात आदर्श ठरेल असा आशावाद व्यक्त केला. शाश्वत स्वच्छतेसाठी गावात राबविलेल्या उपक्रमाने गावाची शान वाढलेली असून सर्वत्र नवरगावची प्रशंसा होत असल्याचे सांगितले. सरपंच संध्या गुरवे यांनी साधल्याने त्यांची अभिनंदन केले व भविष्यात नवरगावाला आदर्श, स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्लॉस्टीक बंदीसाठी सरसावल्या महिला
दरवर्षी मकर संक्रांती पासुन हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून महिला वाण वाटत असतात. वेगवेगळे वस्तू वाणस्वरूपात दिल्या जातात. परंतु यावेळी नवरगाव येथे वाणात आपल्याला कोणती वस्तु देणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हळदी कुंकू कार्यक्रमातून ज्या प्रमाणे शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीचे आवाहन करण्यात आले त्या प्रमाणे सर्वात प्रथम सरपंच लोकेश भेंडाकर, सरपंच संध्या गुरवे, पोलिस पाटील मिनाक्षी लाडसे यांचे हस्ते कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर ग्राम पंचातयच्या महिला सदस्यांनी वाणात सगळया महिलांना कापडी पिशव्या देवून यापूढे प्लॉस्टीक पिशवी नाही तरी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. कापडी पिशव्यांचा वापर दैनंदिन वापर करण्याचे या प्रसंगी महिलांनी सांगितले.