गावपातळीवर क्वारंटाईन कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:08+5:30

मंगळवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बरेचशे नागरिक अन्य जिल्ह्यातून गावपातळीवरही दाखल झाले आहेत. अशा लोकांची चाचपणी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात गावपातळीवरही व्यवस्था होणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हास्तरावर नर्सिंग व संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सुविधा आहे.

Village level quarantine room | गावपातळीवर क्वारंटाईन कक्ष

गावपातळीवर क्वारंटाईन कक्ष

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : सरपंचाच्या नेतृत्वात गठित होणार समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मुंबई, पुणे व अन्य राज्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा स्थितीत शहरासह ग्रामीण भागातही अशा लोकांचे वास्तव्य आहे. परिणामी जिल्हापातळीवरच या सर्वांची व्यवस्था होणे शक्य नसल्याने गाव पातळीवरही क्वारंटाईन कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.
मंगळवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बरेचशे नागरिक अन्य जिल्ह्यातून गावपातळीवरही दाखल झाले आहेत. अशा लोकांची चाचपणी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात गावपातळीवरही व्यवस्था होणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हास्तरावर नर्सिंग व संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सुविधा आहे. मात्र त्यात संख्येपेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन केले जाऊ शकत नाही.
अशावेळी ज्या गावात नागरिक बाहेरून आले अशांची त्याच गावात व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक तरी क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्याचा मानस असून गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व अन्य प्रमुख लोकांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यांच्याच नेतृत्वात क्वारंटाईन कक्षाचे कामकाज व देखरेख ठेवली जाणार आहे. याला स्थानिक प्रशासनासह तालुका व जिल्हा प्रशासनाचीही मदत मिळणार आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी भंडारा शहरातील सर्व नर्सिंग होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या संस्थांची पाहणी केली.
तसेच जिल्हा सीमेवर जाऊन चौकशी केली. क्वारंटाईन कक्षात रुग्णांना सुविधा योग्य मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांनी स्वत: याबाबत शहानिशा केल्याचे याबाबत समजते.

शक्यतोवर शाळांची निवड
गावपातळीवर क्वारंटाईन कक्ष शाळेमध्ये किंवा सुविधा असलेल्या सार्वजनिक स्थळी स्थापन करण्याचे सूचविण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारंटाईन कक्ष उभारण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. एकाच गावात जास्त व्यक्ती परजिल्ह्यातून किंवा अन्य राज्यातून आले असतील तर अशा गावात एकापेक्षा जास्त क्वारंटाईन कक्ष तयार करण्यावरही विचार केला जातो.

अशी राहणार समिती
गावस्तरावर क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात येऊन त्यात समितीचेही गठण करण्यात येत आहे. त्यात गावातील सरपंच, उपसरपंच, त्या शाळेचे मुख्याध्यापक, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे. यात शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण केलेल्या व्यक्तींची नोंद अद्ययावत ठेवणे, नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून संबंधितांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, शाळेचा परिसर व खोल्यांचे रोज निर्जंतूकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला बंधनकारक करणे आदी जबाबदारी राहणार आहे. तसेच शहर पातळीवर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी जबाबदार राहणार आहेत.

Web Title: Village level quarantine room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.