अवैध व्यावसायिकांकडून ग्रामस्थांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:10 PM2018-07-08T22:10:26+5:302018-07-08T22:11:27+5:30

अड्याळहून दोन किमी अंतरावर असलेल्या सौंदड, खापरी पुनर्वसन परिसरात मागील काही वर्षांपासून जनावरांना कत्तलखान्यात ट्रकांमध्ये नेले जात आहे.

The villagers are beaten by illegal businessmen | अवैध व्यावसायिकांकडून ग्रामस्थांना मारहाण

अवैध व्यावसायिकांकडून ग्रामस्थांना मारहाण

Next
ठळक मुद्देअड्याळ येथील घटना : सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी, घटनास्थळावरून पसार झालेले ट्रक व आरोपी मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळहून दोन किमी अंतरावर असलेल्या सौंदड, खापरी पुनर्वसन परिसरात मागील काही वर्षांपासून जनावरांना कत्तलखान्यात ट्रकांमध्ये नेले जात आहे. दरम्यान, शनिवारला सायंकाळी रस्त्यावर ट्रक आडवा करून त्यात जनावरे भरण्याचा प्रकार सुरू होता. दरम्यान, गुरे चराई करून घरी परतणाऱ्या एका गोपालकाने जनावरे भुजाडतात, थोडावेळ थांबा नंतर भरा, असे म्हणताच ट्रकमध्ये असणाºया लोकांनी या गोपालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे अड्याळ येथे वातावरण तापलेले आहे.
अड्याळ पोलिसांनी २० ते २५ आरोपीपैकी शनिवारच्या रात्री १२ वाजता सात आरोपींना तर आज रविवारी चार जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये सहा प्रौढ तर एक अल्पवयीन आरोपी आहे. यात अज्जु शेख, प्रदिप नांगोलकर, सोहेल पठाण, सोयब शेख, जाहिर शेख, तौसिक शेख, चंद्रकांत डोंगरे सर्व रा.अड्याळ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, ३२५, ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात गैरकायद्यांची मंडळी जमवुन लाठ्याकाठ्याने मारहाण करून दुखापत करणे, घरात घुसून महिलांची छेड काढणे, अशा विविध कलमा लावण्यात आले आहे.
त्यानंतर २० ते ३० लोकांच्या समुहाने सौंदड पुर्नवसन येथील लोकांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढून मिळेल त्या साधनाने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत महिला व बालकेही जखमी झाले. त्यानंतर संतप्त सौंदड पुर्नवसनवासीयांनी याची तक्रार अड्याळ पोलीस ठाण्यात केली. याची माहिती घटनास्थळावरून अनेकांनी ठाणेदार यशवंत किचक यांना देऊनही पोलीस घटनास्थळांवर तातडीने पोहोचले नाही. पोलीस तातडीने गेले असते तर कत्तलखाण्यात जाणाºया गाई व आरोपीसुध्दा पोलिसांना सापडले असते.
सौंदड खापरी (पुर्नवसन) येथे दर आठवड्याला १० ते १२ ट्रकमध्ये हजारो जनावरांना कत्तलखान्यात नेण्यात येते. यावर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अड्याळ पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करून नविन ठाणेदार व नविन पोलीस कर्मचारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, स्थानिक गुन्हे शाखेचे आर.ए. मानकर, तुमसरचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे अशा विविध चमू उपस्थित होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक रात्री ८ ते सकाळी ५ पर्यंत संपुर्ण चमूसह अड्याळ पोलीस ठाण्यात उपस्थित होते. अड्याळ येथे पोलिसांच्या तुकड्या आताही तैनात आहेत.
अड्याळ ठाण्यावर ग्रामस्थांचा हल्लाबोल
अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयावह घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे पुर्नवसित ग्रामवासीय दहशतीत आहेत. घटना घडल्यानंतर दोन तसाने संपूर्ण सौंदडवासीय पुर्नवसन तथा अड्याळ ग्रामवासीयांनी पोलीस ठाण्यात रात्रीच तोबा गर्दी केली होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात अनेकांच्या पाठीवर लाठीचे व्रण आहेत. मारहाणीत अनेक महिला जखमी झाल्या असून एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.
अवैध व्यवसाय बंद करा, अन्यथा आंदोलन
अड्याळ शहर व परिसरात कुठलेही अवैध धंदे, सट्टापट्टी, मोहफुलाची दारू गाळणे, जनावरांची तस्करी बंद करणे आणि संपूर्ण आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी व कार्यरत बीट जमादाराविरूद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मागील अनेक वर्षांंपासून अड्याळ परिसरात अवैध व्यवसायांना ऊत आले होते. त्याचवेळी पोलिसांनी यावर प्रतिबंध घातला असता तर आज ही वेळ आली नस्ती, असे लोकांचे म्हणने आहे.
सोमवारी अड्याळ बंदचे आवाहन
जनावरांची कत्तलखान्यात तस्करी करणाऱ्या आरोपींनी निरपराध लोकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारला अड्याळ बंद पुकारण्यात आला आहे. आज सायंकाळीच सर्व पेट्रोलपंपवर सोमवारला बंदचे फलक लावण्यात आले आहे.

सौंदड पुर्नवसन येथे घडलेल्या या गंभीर घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यात सर्व दोषींविरूद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.
- रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा

Web Title: The villagers are beaten by illegal businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.