ग्रामस्थांचा बोगस अधिकाऱ्यांना चोप
By admin | Published: November 20, 2015 01:27 AM2015-11-20T01:27:25+5:302015-11-20T01:27:25+5:30
सिहोरा परिसरातील सीमावर्ती गावात मध्य प्रदेशातील बोगस अधिकारी तथा पत्रकारांच्या टोळीने धुमाकूळ माजविला आहे.
मध्य प्रदेशातील टोळी : सिहोरा परिसरातील सीमावर्ती गावातील प्रकार, पोलीस बंदोबस्ताची मागणी पूर्ण होईल तरी कधी?
चुल्हाड (चुल्हाड) : सिहोरा परिसरातील सीमावर्ती गावात मध्य प्रदेशातील बोगस अधिकारी तथा पत्रकारांच्या टोळीने धुमाकूळ माजविला आहे. या टोळीत महसूल, वन तथा पोलिस विभागाचे बोगस कर्मचारी आहे. या टोळीने जंगलात अनेकांना लुटले असून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा धरणाचा मार्ग या टोळीला रामबाण ठरत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर सिहोरा परिसरातील गावे आहेत. बावनथडी नदीचे पात्र ओलांडताच मध्य प्रदेश राज्याची सिमेला सुरुवात होत आहे. दरम्यान सध्यास्थित बावनथडी नदीचे पात्र आटले आहे. यामुळे अवैध व्यवसायिकांना रान मोकळे झाले आहे. या शिवाय सोंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक पदरी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाने मध्य प्रदेशातील गावांना जोडले आहे. हा धरण जंगलात असल्याने निम्याहून अधिक वाहतूक याच धरणाच्या मार्गाने सुरु आहे. दिवस-रात्र याच धरणावरुन वाहने धावत आहेत. या धरणावर पोलिस तथा वन विभागाची चौकी नाही. धरणावर सुरक्षा नसल्याने अवैध व्यवसायीकांचे चांगेलच फावत आहेत.
याच संधीचा फायदा घेण्यास मध्य प्रदेशातील हाय प्रोफाईल लुटमार टोळीने सुरुवात केली आहे. जंगल शेजारी तथा जंगलात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना टोळीतील सदस्य टार्गेट करित आहेत. आठवडाभर या टोळीने चांगलाच धुमाकूळ माजविला. टोळीतील सदस्य कधी पोलिस तर कधी वनविभागाचे अधिकारी यांचे वेषात जंगलात फेरफटका मारत आहेत. त्यांचे सोबतीला बोगस पत्रकार आहे.
गावातील नागरिकांना शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून रक्कमेची वसूली करित आहेत. अनेक नागरिकांना टोळींच्या सदस्यांनी लुबाडले आहे. या प्रकार व घटनेपासून वन विभाग व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अनभिज्ञ तथा बेखबर आहेत. शासकीय वेषात टोळीतील सदस्य असल्याने गावकऱ्यांनी चौकशी केली नाही. या शिवाय आपण चुकले असल्याने त्यांनी ८-१० हजार रुपये या टोळीला दिले. नंतर टोळीतील सदस्य वेषभुषा बदलवित असल्याचे काही गावकऱ्यांना लक्षात आले. या शिवाय टोळीतील सदस्यांची चर्चा सिमावर्ती गावात सुरु झाली.
यानंतर गावातील काही नागरिकांनी या टोळीला समज देण्यासाठी सापळा रचला. गावातील सरपंच यांनी परिसरात असणाऱ्या पोलीस तथा वन विभागात या टोळीचे सदस्य, कार्यरत कर्मचारी आहेत किंवा नाही. याची सहनिशा व खातरजमा केली. परंतु सबंधीत नावाचे असे कर्मचारी कार्यरत नाही असे निर्दशनास आले. यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावला. सोंड्या परिसरात आंतक तथा लुटमार करणाऱ्या या बोगस टोळीतील सदस्यांना चोप देण्यासाठी सापळा रचण्यात आला.
गावातील एका व्यवसायीकांना टोळीतील सदस्यांनी रडारवर घेतले. आपला व्यवसाय अवैध असल्याने व्यवसायीकांनी देवाण-घेवाण विषयी चर्चा केली. या चर्चेची माहिती त्यांनी लगेच भ्रमणध्वनी वरुन पोहचती केली. गावातील नागरिक गोळा झाले. या बोगस कर्मचाऱ्यांना चांगलेच बदडण्यास सुरुवात केली. टोळीचा पर्दाफास झाल्याने लक्षात येताच सदस्य नदी पात्रातून पळून गेले. तब्बल आठवडाभर हैराण करणाऱ्या टोळी पासून गावकऱ्यांना मुक्ती मिळाली. सध्या स्थित सोंड्या परिसरात भयमुक्त वातावरण असून नविन मागण्यांची ओरड सिमावर्ती गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)