दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत सिहोरा परिसरातील गावांना ‘डच्चू’
By admin | Published: April 12, 2016 12:34 AM2016-04-12T00:34:07+5:302016-04-12T00:34:07+5:30
सलग दोन वर्षापासून प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत डच्चु देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांत नाराजीचा सूर : एकाही गावांचा समावेश नाही
चुल्हाड (सिहोरा) : सलग दोन वर्षापासून प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत डच्चु देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सुर आहे.
सिहोरा परिसरात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. परंतु या प्रकल्पात २०१३ पासून ठिक ठाक नाही. पावसाळ्यात प्रकल्प पाण्याचा उपसा करित आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने अल्प पावसाची हजेरी लावली आहे. निसर्गाच्या पाण्यावर एरवी चांदपुर जलाशयाने ओव्हरफलो पर्यंत मजल मारली आहे. परंतु नाल्यावर जागो जागी बंधारे बांधकाम करण्यात आल्याने चांदपुर जलाशयात निसर्गाचे पाणी पावसाळ्यात पोहचत नाही. या शिवाय बावनथडी नदी पात्राची अशिच अवस्था आहे. दोन महिने पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे नदीचे पात्र पाण्यासाठी त्रस्त होत आहे. या आधी वर्षभर या पात्राने पाण्याचा अनुभव घेतला आहे. या नदीवर राजीव सागर धरणात पाणी अडविण्यात आल्याने पात्रात वाहणारे पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहे.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सोबत संलग्नीत असणाऱ्या ३९ गावात शेतकऱ्यांचे चांगभल असल्याचे शासनाच्या नोंदीत दिसून येत आहे. परंतु परिसरात चित्र उलटेच आहे. गेल्या खरीप हंगामात पावसाने दडी मारली असता धानाची रोवणी उशिरा झाली. रोवणी करणारा कालावधी ओलांडल्याने उत्पादनाचा परिणाम शेतकऱ्यांना भोवला. प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले. यामुळे पाठबंधारे विभागाची पाणी पट्टी कराची वसुली प्रभावित झाली. विविध सेवा सहकारी संस्थाची क्राप लोन देण्यासाठी शेतकऱ्यांनी पायरी चढली नाही. शेतकरी मोठ्या संख्येने थकबाकी दार झाले. या शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दिल्ली व मुंबई दरबारात नियोजन तयार करण्यात येत नाही. (वार्ताहर)
परिसरात सलग दोन वर्षापासून शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून सावरण्यासाठी पाणीपट्टी कराच्या वसुलीत सुट दिली पाहिजे. वैनगंगा नदीवर नवीन प्रकल्पाची गरज आहे.
-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिंदपुरी.