'त्या' मारहाण प्रकरणाचा विमाशि संघातर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 10:00 PM2020-12-11T22:00:47+5:302020-12-11T22:02:23+5:30
कुंटुबियातील सदस्याला मुख्याध्यापक बनविण्याच्या नादात दमदाटी देऊन मुख्याध्यापक पदाचा राजीनामा मागणाऱ्या शाळा संस्थाचालकाने मुख्याध्यापकाला मारहाण केली. सदर घटना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील स्व. रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ९ डिसेंबर रोजीची असून शाळेचे संस्थापक यांनी नातेवाईकांचे संगनमताने शाळेचे मुख्याध्यापक शिवनारायण राणे यांना बेदमपणे मारहाण केल्यामुळे मारहाणीत त्यांचे मनगटावर दुखापत झाली असून एक दात देखील पडले ाआहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यातील रातीराम टेभंरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथील मुख्याध्यापकाला पदाचा राजीनामा देण्याचा तगादा लावून संस्थाचालक व त्याचे नातेवाईकानी ९ डिसेंबर रोजी शिवनारायण राणे यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. तसेच राज्यातील शिक्षक व शिक्षक संघटनानी तीव्र संताप व्यक्त केला असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडाराचे वतीने ११ डिसेंबरला अमानुषपणे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
कुंटुबियातील सदस्याला मुख्याध्यापक बनविण्याच्या नादात दमदाटी देऊन मुख्याध्यापक पदाचा राजीनामा मागणाऱ्या शाळा संस्थाचालकाने मुख्याध्यापकाला मारहाण केली. सदर घटना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील स्व. रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ९ डिसेंबर रोजीची असून शाळेचे संस्थापक यांनी नातेवाईकांचे संगनमताने शाळेचे मुख्याध्यापक शिवनारायण राणे यांना बेदमपणे मारहाण केल्यामुळे मारहाणीत त्यांचे मनगटावर दुखापत झाली असून एक दात देखील पडले ाआहे. शिक्षणाचे पावित्र जपणाऱ्या क्षेत्रातील अत्यंत निंदनीय घटना असून या अमानवीय मारहाण प्रकरणाचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडाराचे वतीने निवेदनाद्वारे जाहीर निषेध ेकरण्यात आला..
तसेच शालेय कर्मचाऱ्यांना संस्थाचालकांकडून झालेल्या या मारहाण प्रकरणाची तिव्रता व संस्थाचालकाची दिवसेंदिवस वाढणाऱ्या मुजोरीची वेळीच दखल घेतली नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून स्व. रातीराम टेम्भरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोहारा या शाळेतील नियमबाह्य झालेले प्रकरणे तसेच गैरप्रकाराची शासन व प्रशासन स्तरावरून सखोल चौकशी करुन दोषींवर अधिकाऱ्यांवरही कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देताना विमाशिचे जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हाकार्याध्यक्ष चंद्रशेखर रहांगडाले, पुरुषोत्तम लांजेवार, भाऊराव वंजारी, अनिल कापटे, धीरज बांते, दारासिंग चव्हाण, जिभकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापकांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण अत्यंत निंदनीय असून अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी कायदा व सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांना वेळीच कडक शासन झाले पाहिजे.
- राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह,
विमाशि संघ. भंडारा.