अमेरिकन डॉक्टरांची भुयार आरोग्य केंद्राला भेट
By admin | Published: November 12, 2016 12:33 AM2016-11-12T00:33:39+5:302016-11-12T00:33:39+5:30
पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भुयार प्राथमिक आरोग्य केंद्राला अमेरिकेतील डॉक्टरांच्या चमूने अम्बा व अॅस्पिरीन (एएमबीए) प्रकल्पाअंतर्गत भेट दिली.
भुयार : पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भुयार प्राथमिक आरोग्य केंद्राला अमेरिकेतील डॉक्टरांच्या चमूने अम्बा व अॅस्पिरीन (एएमबीए) प्रकल्पाअंतर्गत भेट दिली.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील आठ वर्षापासून सेवाभावी संस्थांच्या मदतीने अम्बा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. गरोदर माता व बालकांचे आरोग्य हा योजनेचा मुख्य हेतू असून चांगल्या आरोग्यसेवेवर भर देण्यात येत आहे. या भेटीत बॉस्टल स्कुल अमेरिका आॅफ पब्लिक हेल्थचे मुख्य संशोधक डॉ.पॅट्रीशिया एल. हिस्बार्ड, नागपूर येथील अंबा प्रोजेक्टच्या प्रमुख अर्चना पटेल, डॉ.प्रबीरकुमार दास, डॉ.अनुकंपा कुंभारे उपस्थित होत्या. या भेटी दरम्यान भुयार आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली हिंगे यांनी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राच्या गरोदर मातांची तपासणी, नवजात शिशुंची काळजी या विषयावर माहिती दिली. या चमूने संपूर्ण दवाखाण्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या प्रोजेक्टद्वारे बाळाच्या अपुऱ्या दिवसाचा जन्म टाळण्यासाठी अॅस्पिरीन वेळेपूर्वीची प्रस्तुती टाळणारा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या प्रोजेक्टमध्ये बाळाच्या अपुऱ्या दिवसाच्या जन्माची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. गर्भवती स्त्री व होणारे बाळांविषयी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले जाते. (वार्ताहर)
अमेरिकेतील डॉक्टरांच्या भेटीने गर्भवती माता व होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन माहिती मिळण्यास मदत झाली. हा प्रोजेक्ट ग्रामीण भागात उपयुक्त आहे.
- डॉ.वैशाली हिंगे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, भुयार.