माजी क्रिकेटपटू वेंगसरकर यांची अभयारण्याला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:46 PM2018-01-09T23:46:46+5:302018-01-09T23:47:22+5:30

उमरेड-पवनी-कऱ्हां डला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात अनेक वाघ असल्यामुळे रोजच मोठ्या संख्येने पर्यटक जंगल सफारीसाठी पवनीच्या जंगलात येत आहेत.

A visit to the former cricketer Vengsarkar's Wildlife Sanctuary | माजी क्रिकेटपटू वेंगसरकर यांची अभयारण्याला भेट

माजी क्रिकेटपटू वेंगसरकर यांची अभयारण्याला भेट

Next

आॅनलाईन लोकमत
पवनी : उमरेड-पवनी-कऱ्हां डला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात अनेक वाघ असल्यामुळे रोजच मोठ्या संख्येने पर्यटक जंगल सफारीसाठी पवनीच्या जंगलात येत आहेत. माजी क्रिकेट पटू दिलीप वेंगसरकर यांनी जंगलसफारीचा आनंद लुटला.
सदर अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्राच्या जंगल सध्या सात वाघ, अनेक बिबटे, हरीण, रानगवे, निलगाय, रानडुक्कर आदी वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत.भारताचे माजी क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर एका कार्यक्रमानिमित्त नागपुरला आले होते. त्यांना पवनीच्या जंगलातील वाघांची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी पवनीला जाण्याचे ठरविले व पवनीकरिता रवाना झाले. पवनीमध्ये दिलीप वेंगसरकर यांचे आगमन झाल्यानंतर दुपारी २.३० वाजताच्या जंगलसफारीकरिता पवनी गेटमधून अभयारण्यातील जंगलाकडे खुल्या जिप्सीमधून रवाना झाले. त्यांच्यासोबत विदर्भ संघाचे कोच सुब्रतो बॅनर्जी, वनक्षेत्राधिकारी (वन्यजीव) दादा राऊत होते. तीन तासांची वनभ्रमंती करून परत आले. वेंगसरकर यांना वन्यप्राण्यांनी दर्शन दिल्यामुळे ते फार आनंदीत झाले.

Web Title: A visit to the former cricketer Vengsarkar's Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.