विठ्ठल नामाचा गजर :
By admin | Published: July 16, 2016 12:30 AM2016-07-16T00:30:23+5:302016-07-16T00:34:35+5:30
आषाढी एकादशीनिमित्त पवनी येथे भाविकांनी दिंडी काढली. ताळ व मुदृंगाच्या गजरात विठ्ठल...... विठ्ठल....विठ्ठल
कोल्हापूर : गेले पाच दिवस संपूर्ण राज्यात अडतीवरून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केटमध्ये झालेली कोंडी अखेर शुक्रवारी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे फुटली. आज, शनिवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी घेतला असून, सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत अडत भरण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
नियमनमुक्त व सहा टक्के अडत व्यापाऱ्यांकडून वसुलीबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात सोमवार (दि. ११) पासून व्यापाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांनी बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा केली. नियमन हे व्यापाऱ्यांबरोबर समितीलाही मारक आहे. अडत व्यापाऱ्यांकडून वसुली केली तर त्यांचा बोजा ग्राहकांवर पडणार; तरीही सरकारच्या विरोधात व्यापारी जाणार नसल्याचे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. आर. वाय. पाटील, राजेंद्र लायकर, जयवंत वळंजू यांनी बाजू मांडली.
दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे निसर्गाच्या तावडीतून राहिलेला माल सडून निघाल्याचे सांगत जगाच्या पाठीवर केवळ शेतीमालच लिलावात विकला जातो. आमचा लिलाव तर करताच; पण त्यात वेठीस धरू नका. परवडत असेल तर माल घ्या. अडतीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करणे योग्य नाही. अडतीचे पैसे वजा करूनच तुम्ही दर बोलणार; त्यामुळे यात शेतकऱ्यांचाच तोटा होणार आहे. अनेक वर्षांच्या लढाईला यश आले. आठमुठे धोरण न घेता संप मागे घेण्याची विनंती शेट्टी यांनी केली. दहा वर्षांपूर्वी आघाडी सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू असली तरी इतर राज्यांत तो कसा राबविला जातो, याच्या अभ्यासासाठी समितीची नेमली असून कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा उद्देश नाही. समितीच्या अहवालात त्रुटी असल्या तरी त्यांच्यावर चर्चेस सरकार तयार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन संप मागे घेत शनिवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे, सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेट्टी यांनी बारामती येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एक रुपया पट्टीचे उदाहरण दिले. यावर कोल्हापुरात असे होत नसल्याचे वळंजू यांनी सांगितले. त्यांना रोखत ‘सगळे चांगले सांगू नका; शंभर पोती फ्लॉवर विकून भाडेसुद्धा हातात पडत नसल्याचे एका शेतकऱ्याने बैठकीत सांगितल्याने गोंधळ उडाला. अखेर शेतकऱ्यांना शांत करीत ते व्यासपीठ वेगळे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
पिस्तूल घेऊन बैठकीला येणारी ‘बांडगुळे’
व्यापाऱ्यांना बांडगुळे, कसाई म्हटले जाते; पण आमच्यामुळेच परिवर्तन घडल्याचे व्यापारी आर. वाय. पाटील यांनी शेट्टी यांना उद्देशून सांगितले. ‘बांडगुळे’ हा शब्द कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांबद्दल वापरला नाही; तर कमरेला पिस्तूल लावून बैठकीला येणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल बोललो. असा वर्ग व्यापाऱ्यांमध्ये असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
‘टीडीएस’बाबत वित्तमंत्र्यांना भेटणार
यावर याबाबत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र घेऊन आपण स्वत: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
अडत व्यापाऱ्यांनी दिली तर त्यावर पाच टक्के ‘टीडीएस’ द्यावा लागणार असल्याचे सदानंद कोरगावकर यांनी निदर्शनास आणून दिले.