वत्कृत्व स्पर्धेत दिशा व पारसची बाजी
By admin | Published: August 4, 2016 12:37 AM2016-08-04T00:37:54+5:302016-08-04T00:37:54+5:30
वत्कृत्व स्पर्धेला दिलेले दोन विषय भारतीय सण व भारतीय संस्कृती कठीण वाटत असताना...
२७ शाळांतून स्पर्धक : जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा : वत्कृत्व स्पर्धेला दिलेले दोन विषय भारतीय सण व भारतीय संस्कृती कठीण वाटत असताना जिल्ह्यातील २७ शाळेमधून इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम, ७१ स्पर्धकांनी आपले मत मांडताना भारतातील विविध सण व संस्कृती यांचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे आयोजन येथील मंगलम् सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सायंन्स अकॅडमिचे संचालक नरेंद्र पालांदूरकर, अरविंद लांजेवार, डॉ. मुकूंद आडूलकर, विक्रम फडके यांच्या हस्ते करण्यात आले. वयोगट ५ ते १० मधून रॉयल पब्लिक स्कूलची दिशा शेवाळे प्रथम क्रमांकाकरिता निवडण्यात आली. भारतीय सणाची विशेषता सांगताना अनेकतेत एकता कशी आहे हा मुद्दा पटवून दिला. स्प्रिंगडेल स्कूलचा परिमल कोरे द्वितीय तर महिला समाज शाळेचा गिरीज धकातेनी तृतीय क्रमांक पटकाविला तर प्रोत्साहनपर आर्या वाढई, दिशांत धाबेकर, खुशी पुरूषार्थी सृजल येले यांची निवड करण्यात आली.
वयोगट ११ ते १५ मधून सनिज स्प्रिंग डेल शाळेचा विद्यार्थी पारस कोरे यांची प्रथम क्रमांक पटकावून प्रेक्षकांची मन जिंकली. भारतीय संस्कृती ही मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहे, असे मत व्यक्त केले तर त्याच शाळेची रक्षा चोपकर द्वितीय व संत शिवराम महाराज शाळेचा नुशार बावणकर याने तृतीय क्रमांकाचे बक्षिस जिंकले. प्रोत्साहनपर मनिष झाडे, नंदिनी भावसार, ईश्वरी मुनगिनवार, प्राप्ती टांगले व सानिध्य शुक्ला यांची निवड झाली. डॉ. मनिषा भोयर, परिक्षक विक्रम फडके, किरण भावसार व ग्रिष्मा खोत यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून जयेश भावसार यांनी बालविकास मंचच्या उपक्रमाची स्तुती करून अशाच शैक्षणिक कार्यक्रम वार्षिक उपक्रमात राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी बालविकास मंच सदस्य नोंदणी अभियान २०१६-१७ ची माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात महर्षी विद्या मंदिर, सेंट पिटर्स स्कूल, सेंट पॉल, पोदार स्कुल, कारधा, जीएनटी कॉन्व्हेंट नूतन कन्या, लाल बहादूर शास्त्री, उज्वल कॉन्व्हेंट, अंकुर विद्या मंदिर, प्राईड कॉन्व्हेंट, सेंट मेरिस स्कुल, स्कुल आॅफ स्कॉलर्स, अश्विनी स्कुल आॅफ एक्सेलंस, नूतन महाराष्ट्र विद्यालय, पा.वा. नवीन मुलींची शाळा, मार्डंडसर आय इंटरनॅशनल स्कूल, ड्रिम डेल स्कुल, युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कुल लाखनी, शिरिण बाई नेत्रावाला स्कुल तुमसर, जिल्हा परिषद शाळा भोवरी, जिल्हा परिषद शाळा लाखनी आदी शाळेचा समावेश होता. संचालन बाल विकास मंच जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे तर आभार युवा प्रतिनिधी स्रेहा वरकडे यांनी मानले. धनश्री खोत, तिरज बरडे व भाग्यश्री बरडे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)