आषाढीच्या परंपरेत कोरोनामुळे खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:24+5:30

शहरातील विठ्ठल मंदिरासह ग्रामीण भागातील अनेक भागात वारकऱ्यांनी घरी राहूनच तर काही ठिकाणी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक मंदिरामध्ये तसेच शाळांमधून आषाढी वारीनिमित्त दिंड्या काढण्याची परंपरा होती. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या निर्देशांचे पालन करून अनेकांनी गर्दी करणे टाळले.

Volume due to corona in the tradition of Ashadhi | आषाढीच्या परंपरेत कोरोनामुळे खंड

आषाढीच्या परंपरेत कोरोनामुळे खंड

Next
ठळक मुद्देमोजक्याच भाविकांची उपस्थिती : विठ्ठल-रुक्मीणीचे घरी राहूनच घेतले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विठूनामाचा गजर तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात जिल्ह्यातील विठ्ठल मंदिर आषाढीच्या दिवशी गजबजलेले असतात. मात्र यंदा प्रथमच कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील मंदिरात कुठेही गर्दी दिसून आली नाही. वर्षानुवर्षाची आषाढीची परंपरा यंदा प्रथमच खंडीत झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.
शहरातील विठ्ठल मंदिरासह ग्रामीण भागातील अनेक भागात वारकऱ्यांनी घरी राहूनच तर काही ठिकाणी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक मंदिरामध्ये तसेच शाळांमधून आषाढी वारीनिमित्त दिंड्या काढण्याची परंपरा होती. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या निर्देशांचे पालन करून अनेकांनी गर्दी करणे टाळले. दरवर्षी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली असते. मात्र यंदा प्रथमच मंदिर शांत गर्दीविना दिसून आली. अनेक ठिकाणी मोजक्याच धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन केलेले चित्र दिसले. त्यामुळे दरवर्षी साजºया होणाºया ठिकठिकाणच्या कार्यक्रमाला कोरोनाने खंडीत केले.
पावसाला सुरुवात होताच वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढीच्या एकादशीचे. यानिमित्ताने अनेक जण पंढरपूरला जातात. मात्र यावर्षी बस, रेल्वे बंद असल्याने अनेकांना पंढपूरला जाता आले नाही. त्यामुळे अनेकांनी घरी बसूनच आॅनलाईन विठ्ठल दर्शन तसेच गावातील मंदिरामध्ये दर्शन घेतले.

प्रथमच वारकऱ्यांविना दिसली मंदिरे
भंडारा शहरासह तुमसर, अड्याळ, कोंढा, साकोली येथे दरवर्षी दिंड्या काढण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी लाखनी तालुक्यातील भूगाव येथील विठ्ठल मंदिरात देखील भक्तांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांना असलेली वर्षानुवर्षाची परंपरा प्रथमच खंडीत झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक वारकऱ्यांनी किमान पुढच्या वर्षी तरी आपल्याला वारी करण्याचे भाग्य मिळू दे, तसेच कोरोना संकट लवकरात लवकर करण्यासाठी प्रार्थना केली. अनेक ठिकाणी मात्र मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन कार्यक्रम पार पडले.

Web Title: Volume due to corona in the tradition of Ashadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.