स्वयंसेविकांनी देशहिताचे कार्य करावे
By admin | Published: January 13, 2017 12:18 AM2017-01-13T00:18:23+5:302017-01-13T00:18:23+5:30
युवा शक्तिला संरचनात्मक आणि विधायक कार्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो आहे.
रंजना श्रृंगारपुरे यांचे प्रतिपादन : खोकरला येथे रासेयो शिबीर
भंडारा : युवा शक्तिला संरचनात्मक आणि विधायक कार्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबर त्याच्यांमध्ये श्रमाची आवड, युवा शक्तिची जाणीव, सुप्त व कलागणांना वाव तसेच मानवी गुणांचा व मुल्यांचा विकास व्हावा हा मुख्य उद्देश रासेयो शिबिराचा आहे. पुढे युवकांची चळवळ म्हणून उपक्रम समोर आणायचा असल्याने, स्वयंसेविकांनी देशहितासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन प्रा. रंजना शृंगारपूरे यांनी केले.
खोकरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती आर.एम.पटेल महिला कला महाविद्यालय भंडाराचे राष्ट्रीस सेवा योजना शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून खोकरला ग्रामपंचायतच्या सरपंचा नैलिला कोडापे तर अध्यक्षस्थानी डॉ. शृंगारपूरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक लांडगे, सदस्य यशंवत भोयर, करमचंद वैरागडे व शिरीश नखाते, प्रा. डॉ. कैलास ईश्वरकर, प्रा. राहुल भोरे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. नरेश बोरकर आदी मंचावर उपस्थित होते.
सर्व अतिथींचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी उदघाटनीय भाषणात सरपंचा नैलिला कोडापे व इतर मान्यवरांनी विद्यार्थींनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोरदत्त पाखमोडे यांनी केले. संचालन प्रा. डॉ.श्वेता वेगड यांनी तर आभार प्रा.पाखमोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी कल्याणी तरारे, लक्ष्मी हटवार, शिवानी तरारे, रश्मी घोटेकर, शिवानी परिहार, कोमल बावनकर, मेनवाडे, विशाखा गजभिये, पल्लवी गाडगे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)