मतदारा तू जागा हो, लोकशाहीचा धागा हो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती केल्या जात ...

Voters, you are the place, the thread of democracy! | मतदारा तू जागा हो, लोकशाहीचा धागा हो !

मतदारा तू जागा हो, लोकशाहीचा धागा हो !

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्यांग ज्येष्ठ नागरिक व नवमतदारांकरीता स्वीप कार्यक्रमातून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती केल्या जात आहे. मिरेगाव येथे मतदारा तू जागा हो, लोकशाहीचा धागा, हो मतदान करा ह अशा घोषवाक्यातून दिव्यांग नवमतदार व ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानाची व्यापक जनजागृती करुन आवाहन करण्यात आले.
तहसीलदार विराणी यांच्या मार्गदर्शनात लाखनी तालुक्यातील मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, मेंढा, पळसगाव, कोलारी निमगाव व कन्हाळगाव येथे नोडल अधिकारी नरेश नवघरे ग्रामसेवक भोतमांगे, मेश्राम, तलमले, गायधने, बारसे, नंदेश्वर यांच्या पथकाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानाची जनजागृती करण्यात आली. नागरिकांना लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्व, ईव्हिएम व व्हिव्हिपॅटबाबत प्रात्यक्षिक तसेच दिव्यांग मतदारांकरीता मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मिरेगाव येथे मतदारा तु जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान करा ह अशा स्वरुपाचे संदेश संदेश रांगोळी व रोपटे यांच्या माध्यमातून देवून मतदारांना आवाहन करण्यात आले. उपरोक्त गावात पार पडलेल्या जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

१० व ११ ऑक्टोबरला जनजागृती
१० ऑक्टोबरला गोंडेगाव, गुरठा, इसापूर, नेहारवाणी, मचारणा , कवडसी येथे दिवसभर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांना जागृत केल्या जाणार आहे. ११ ऑक्टोबरला पोहरा, लाखोरी, गोंडसावरी, लाखनी, लाखनी शासकीय आयटीआय, येथे ग्रामपंचायत कार्यालयात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

Web Title: Voters, you are the place, the thread of democracy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.