19 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 09:55 PM2022-10-15T21:55:42+5:302022-10-15T21:56:35+5:30

भंडारा तालुक्यातील खराडी, परसोडी, राजेदहेगाव, खैरी पा., संगम पु., पिंपरी पु., भोजापूर, केसलवाडा, खमाटा, सालेबर्डी, सिरसघाट पु., टेकेपार पु., तिड्डी, बोरगाव बु., इटगाव, सुरेवाडा, तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज,पवनी तालुक्यातील गोसे बुज आणि साकोली तालुक्यातील सिलेगाव टोला या ग्रामपंचायतीची निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे.

Voting today for 19 Gram Panchayats | 19 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

19 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चार तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची थेट सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक रविवार १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ७२ तर १२२ सदस्य पदासाठी ३२५ उमेदवार रिंगणात आहेत. दहा सदस्य अविरोध निवडून आले आहे. जिल्ह्यातील ६५ मतदान केंद्रावर २८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
भंडारा तालुक्यातील खराडी, परसोडी, राजेदहेगाव, खैरी पा., संगम पु., पिंपरी पु., भोजापूर, केसलवाडा, खमाटा, सालेबर्डी, सिरसघाट पु., टेकेपार पु., तिड्डी, बोरगाव बु., इटगाव, सुरेवाडा, तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज,पवनी तालुक्यातील गोसे बुज आणि साकोली तालुक्यातील सिलेगाव टोला या ग्रामपंचायतीची निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. १९ ग्रामपंचायतीच्या ६१ प्रभागात निवडणूक होत असून ६५ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून १२२ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. ३२५ उमेदवार रिंगणात आहेत. तर १६ सरपंच पदासाठी ७२ उमेदवार आपले भाग्य अजमावित आहे. त्यासाठी ५४ मतदान केंद्राची नियुक्ती करण्यात आली. २४० कर्मचारी व ५४ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात १९ ग्रामपंचायतीसाठी नियोजन करण्यात आले आहे. पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहे. निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी तहसील कार्यालयातही चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

२८ हजार ५५४ मतदार बजावतील हक्क

- जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात १४ हजार ३६० पुरूष तर १४ हजार १८० महिला मतदारांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील २३ हजार ३२५ मतदार आपला हक्क बजावणार असून त्यात पुरूष ११ हजार ७२४, महिला ११ हजार ६०१ मतदारांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ३७९७ मतदार असून १९१० पुरूष तर १८८७ महिला मतदार आहेत. पवनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ९४६ मतदार असून साकोली तालुक्यात ४७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सोमवारी होणार मतमोजणी
- १९ ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी आटोपल्यानंतर सोमवार १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. भंडारा येथे तहसील सभागृहात मतमोजणी होणार आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीची प्रचंड उत्सुकता असून थेट सरपंचाची निवडणूक होत असल्याने मोठी रंगत आली आहे. सर्वांचे लक्ष आता सोमवारकडे लागले आहे.

 

Web Title: Voting today for 19 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.