भंडारा जिल्ह्यात २० वर्षांपासून झाले नाही गिधाडांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:30+5:302021-09-04T04:42:30+5:30

साकाेली : निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षाचे २० वर्षांपासून कुणालाच दर्शन झाले नाही. एकेकाळी जनावर मृत्युमुखी ...

Vultures have not been seen in Bhandara district for 20 years | भंडारा जिल्ह्यात २० वर्षांपासून झाले नाही गिधाडांचे दर्शन

भंडारा जिल्ह्यात २० वर्षांपासून झाले नाही गिधाडांचे दर्शन

Next

साकाेली : निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षाचे २० वर्षांपासून कुणालाच दर्शन झाले नाही. एकेकाळी जनावर मृत्युमुखी पडले की, गावाच्या आकाशात गिधाड घिरट्या घालायच्या पंरतु विविध कारणाने गिधाड आज नामशेष झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात शेतसाेबत पशुपालन केले जाते. पूर्वी माेठ्या प्रमाणात गावाेगावी जनावरांची संख्या हाेती. एखादे जनावर मृत्युमुखी पडले की, त्याला गावाच्या बाहेर ढाेरफाेडी ठेवले जायचे. लगेच एकदाेन दिवसात आकाशात गिधाडे घिरट्या घालायचे. २५ ते ३० गिधाड मृत जनावराची विल्हेवाट लावायचे. यामुळे पर्यावरण स्वच्छ राहत हाेते. भंडारा जिल्ह्यातील गावागावांत गिधाडांचे अस्तित्व हाेते.

गिधाड हा मांस भक्षी प्राणी असून ताे मृत जनावरांचे मांस खाऊन जगताे. परंतु आता गिधाडांची प्रजाती जिल्ह्यातून कायमची नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. पक्षीअभ्यासक विनाेद भाेवते सांगतात २० वर्षांपूर्वी सर्वत्र गिधाड दिसायचे. १ ऑगस्ट २००४ राेजी त्यांनी साकाेली तालुक्याच्या उमरी येथे दाेन पांढऱ्या पाठीचे गिधाड बघितले. त्यानंतर २००६ मध्ये माेरगाव अर्जुनी तालुक्यातील गांधारी पहाडावर विनाेद भाेवते आणि बी. एम. फुलबांधे यांना सात गिधाड दिसले. परंतु २००८ पासून जिल्ह्यात कुठेही गिधाड दिसले नाही, असे सांगतात.

बाॅक्स

डायक्लाेफेनकने केला घात

पूर्वी गिधाडांची संख्या विपूल हाेती. गुरेढाेरेही माेठ्या संख्येने हाेती. परंतु गिधाडांची प्रजात नष्ट झाली. यामागचे मुख्य कारण म्हणजे डायक्लाेफेनक हे वेदनाशमक औषध हाेय. हे औषध जनावरांवर उपचारासाठी उपयाेगात आणले जात हाेते. मात्र त्या जनावराचा मृत्यू झाल्यानंतर गिधाड ते मांस खातात तेव्हा हे औषध गिधाडांच्या शरीरात जाते आणि गिधाडाचे मूत्रपिंड निकामे हाेऊन मृत्यू हाेताे. त्यामुळेच २००६ पासून या औषधावर बंदी घालण्यात आली. परंतु ताेपर्यंत गिधाड नामशेष झाले हाेते.

काेट

निसर्गाचा सफाई कामगार गिधाड नामशेष हाेणे हे पर्यावरणासाठी घातक आहे. गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी शासकीय स्तरावर माेठ्या प्रमाणात प्रयत्न हाेण्याची गरज आहे.

- विनाेद भाेवते

पक्षी अभ्यासक साकाेली

Web Title: Vultures have not been seen in Bhandara district for 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.