लोककलावंत करताहेत मजुरीचे काम; सरकारी मदत केवळ नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:21+5:302021-08-14T04:41:21+5:30
भंडारा : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांडण्याचे अनमाेल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करत आले आहेत. कलावंताप्रती उत्तरदायित्व म्हणून ...
भंडारा : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांडण्याचे अनमाेल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करत आले आहेत. कलावंताप्रती उत्तरदायित्व म्हणून सरकार अशा कलावंतांना मदतीचा हात देते. त्यासाठी राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे वर्ग पाडण्यात आले आहेत. कलावंतांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन तोकडे आहे. तर सर्वच क्षेत्रातील कलावंतांसाठी आजघडीला मोलाचा आधार आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंदी असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आहे.
बॉक्स
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना मानधन म्हणून २२५० रुपये जाहीर झाले.
ज्यावेळेस ग्रँड उपलब्ध होईल त्यावेळेस ही मदत लोककलावंतांच्या खात्यात वळती होते.
अनेकवेळा ही मदत कलावंतांना वेळेवर मिळत नाही. ती केवळ नावालाच असल्याचे बोलले जाते.
कोरोना संकटात कलावंतांना उपासमारीची पाळी आल्याने संकटात असलेल्या कलावंतांना राज्य शासनाने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असली तरी ही मदत अत्यल्प आहे. उलट जनजागृतीची कामे करावी लागत आहेत.
बॉक्स
मदत हातात किती उरणार ?
कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम थांबले आहेत. यातून कलावंत अडचणीत आले आहेत.
पूर्वी क वर्गातील लोककलावंतांना एक हजार ५०० रुपयांचे मानधन मिळत होते. आता २२५० रुपये मिळते.
ही मदत काही मोजक्याच लोकांच्या हाती पडते. शेकडो कलावंत अजूनही उपेक्षित आहेत.
बॉक्स
जिल्ह्यात ९१५ कलावंतांची यादी
दरवर्षी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कलावंतांची निवड केली जातो.
राष्ट्रीयस्तरावरील कलावंतांना अ दर्जा, राज्यस्तरावर ब दर्जा तर स्थानिक स्तरावर क दर्जा असतो.
एकावर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी ५०० ते ७०० अर्ज येतात.
कोट
लोककलावंतांची अवस्था फार वाईट आहे. अनेक जण राेज मजुरी करत आहेत तर काही महिला भांडे घासण्याचे कामही करीत आहेत. शासनाकडून तरुण कलावंतांना कुठलीही मदत नाही.
- अंबादास नागदेवे
कोट
गत दोन वर्षांपासून हाताला काम नसल्याने मोलमजुरीचे काम सुरू केले आहे. अलीकडे रोज मजुरीचे साधनच उरले नाही. मिळेल ती कामे करून उपजीविका भागविली जाते.
- महेंद्र वाहाणे
कोट
लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी लोककलेतून कार्यक्रम सादर करण्यासाठी शासनाने बंदी घातली. त्यामुळे मदतीचा ओघ बंद झाला आहे. सध्या पेंटिंग व थर्माकोलची कामे करून पोट भरतो.
- स्वप्निल रामटेके